6 ऑक्टोंबर प.पुज्य शेषराव महाराज पुण्यतिथी निमित्त महागाव, चंद्रपूर, बुलठाणा, शिरपूर दिंडी, रॅलीचे आयोजन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : प.पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर ची जिल्हा बैठक श्री.अनिल डोंगरे जिल्हा अध्यक्ष प.पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री.लक्ष्मीकांत धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री पंडित काळे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री दिगंबर वासेकर, जिल्हा संघटक यांचे प्रमुख उपस्थितीत शामा प्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथील पार पडली.

बैठकीत प.पुज्य शेषराव महाराज यांच्या बुलठाणा, शिरपूर येथील पुण्यतिथी कार्यक्रमाला महागाव, चंद्रपूर, बुलठाणा, शिरपूर रॅली, दिंडी चे आयोजन करण्यात यावे तसेच संघटनेच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी सर्व विषयाला एकमताने होकार दिला.

यावेळी श्री.सूरज जिभकाटे, श्री.अविनाश राऊत, श्री.भालचंद्र रोहणकर, श्री.प्रकाश अलगमकर, श्री.दीपक ठाकरे, श्री.महादेव मांडवकर श्री.मारोती वाकुलकर श्री. भोजराज एकोणकार, श्री.साईनाथ कुनघाटकर, श्री जालिंदर भडके, श्री.भाऊजी चापडे, श्री.बबन गुरुनुले, प्रामुख्याने उपस्थिती होते.

"एक गाव एक गणपती", चिंचमंडळ येथील अष्टविनायक गणेश मंडळ तब्बल २५ वर्षाची परंपरा

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ इथल्या अष्टविनायक गणेश मंडळ तब्बल २५ वर्षाची परंपरा आहे ..!
तब्बल दहा दिवस चालणाऱ्या या गणेश उत्सवाला आज महाप्रसादाचा कार्यक्रम असुन यामध्ये सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.!

"एक गाव एक गणपती" म्हणून अष्टविनायक गणेश मंडळ चिंचमंडळ येथे गेल्या २५ वर्षांपासून नवयुवक मंडळी गणेश स्थापना करतात. या मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात, यंदाही अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ, चिंचमंडळ द्वारा खुली नृत्य स्पर्धा (Open Dance Competition) आयोजित करण्यात आली होती. 

यात गावातील लहान मुलां-मुलींनी सहभाग घेतला असून ही नृत्य स्पर्धा खुली असल्यामुळे यात वयाचे बंधन नव्हते, या नृत्य स्पर्धेत एकूण 15 लहान मुले-मुली सहभागी होऊ झाले. आज सायंकाळी गणेश आरती नंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात होणार असून आगमनापर्यंत असणार आहे. तसेच उद्या दि. 10 संप्टेंबर ला दुपारी 3 ते रात्री दहा पर्यंत गणेश विसर्जनाचा कार्यक्रम असल्याचे अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाचे अनिकेत झाडे (अध्यक्ष), अतुल पचारे (उपाध्यक्ष), वैभव सोनटक्के (सचिव), संजय मोहरे (सह सचिव), सदस्य सुजीत भेदूरकर, आतिश कवाडे, शेखर राऊत, सुहास दानव, सुमित दानव, विकास दानव, विलास कोल्हे, गणेश क्षीरसागर, मोहम्मद खां पठाण, वासुदेव विखणकर, चंद्रकांत उरकुडे, प्रकाश मांढरे, स्वप्नील लडके, शुभम पालकर पदाधिकाऱ्यांनी "सह्याद्री चौफेर" माहिती दिली. 

मारहाण प्रकरणी शिक्षा

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी जामणी : शिविगाळ प्रकरणी भूषण वाढई प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी झरी जामणी यांनी झरीजामणी तालुक्यातील आरोपी नामे मंगेश बाबाराव लसंते वय २७ वर्षे रा. खडकडोह यास अठरा महीन्याचे कालावधीसाठी सदवर्तनाच्या अटी व शर्तीवर परिविक्षाधीन ठेवणेबाबतची शिक्षा ०५ सप्टेंबर रोजी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, झरीजामणी तालुक्यातील फिर्यादी ही मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत राहते. फिर्यादी व आरोपी हे जुन्या घरगुती कारणावरून एकमेकासोबत बोलत नाही दि.०९ डिसेंबर २०१६ रोजी सांयकाळी ५.३० वाजता फिर्यादी ही दळणाचे चक्कीवरुन घरी परत येत असताना आरोपी पुतण्या हा फिर्यादीचे समोर येऊन माझे सोबत का बोलत नाही असे म्हटले असता तुझ्या सोबत का बोलायचे असे फिर्यादी बोलली. असता आरोपीने काही न बोलता हातात सोबत आणलेल्या छोट्या चाकुसारख्या शस्त्राने फिर्यादीचे मनगटावर व दंडावर मारुन जखमी केले फिर्यादी ओरडली असता आरोपीने जीवाने मारण्याची धमकी देवुन पळुन गेला. त्यानंतर फिर्यादी ही घरी जावुन घडलेली घटना पतीला सांगुन पतीसह जखमेवर उपचार करून पोलीस स्टेशन मुकुटबन ला रिपोर्ट दिला. या वरुन पोलीसांनी आरोपी विरूद्ध भादवीचे कलम ३२४,५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला. व सदर गुन्हाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल नेहारे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी, डॉक्टर व तपास अधिकारी यांचे सह दहा साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पवनजीतसींग कपुर व ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी नापोका संतोष मडावी व जमादार मारोती टोंगे यांनी काम पाहीले.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक संघ कार्यकारणी गठीत व शिक्षक पालक सभेचे आयोजन

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे दि 8 सप्टेंबर रोजी पालक शिक्षक कार्यकारणी गठीत झाली या कार्यकारणी चे अध्यक्ष मुख्याध्यपक क्षीरसागर सर उपाध्यक्ष पालक राजू गव्हाणे सचिव देशमुख मॅडम सहसचिव पालक पूनम पुरेवार नारलावार मॅडम यांची कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के मुख्याध्यपक क्षीरसागर सर तर उपमुख्याध्यापक तामगाडगे सर यांच्या मार्गदर्शना खाली पालक शिक्षक सभा घेण्यात आली.

यावेळी पालकांनी अनेक समस्या मांडल्या त्या समस्यांचे निराकारण मुख्याध्यापक व उपमुख्याघ्यापक तसेचे सहसचिव सोनटक्के सर यांनी निराकारण केले विद्यार्थी हा केंद्राबिंदू असून पालक आणि शिक्षक यांना जोडणारा दुवा आहे पाल्यांच्या विकासाची जबाबदारी ही पालक व शिक्षक या दोघांचीही आहे असे मत मान्यवर मंडळींनी प्रकट केले या वेळी पालक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख मॅडम तर आभार नारलावार मॅडम यांनी मानले.

जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक करणार कामबंद आंदोलन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : महिलांना प्रसूतीपूर्वी तसेच नंतर स्तनदा मातांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत १०२ रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे; परंतु, मागील चार महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांचे वेतन झालेले नाही.

कोरोना सारख्या महामारीत आपली व आपल्या परिवाराची जिवाची पर्वा न करता त्यानी सेवा देण्याचे काम केले व करत आहेत परंतु त्यांना योग्य मानधन दिले जात नाही व दिले जाते तर 4 महिने पर्यंत त्यांना वेतनाची वाट पहावी लागते त्याना कत्रांटदारामार्फत 7300 रू वेतन देऊन त्याची बोळवन केली जाते.त्यामुळे या रुग्णवाहिकांच्या चालकांनी निवेदन च्या माध्यमातून संबंधित कंत्राट रद्द करून समान काम समान वेतन देण्याची मागनी केलेली आहे व 8/10 दिवसात थकित वेतन देण्याची मागणी वाहन चालक यांनी केलेली आहे व वेतन न दिल्यास 20 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आदोलन करणार असे,निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब. मा. मूख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदनातून दिला आहे. सारथी वाहनचालक संघटनेच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, '१०२' क्रमांकाच्या रुग्णवाहिका आहेत. ईनोवेशन प्रा. लिमिटेड कंपनीकडून कंत्राटी पद्धतीवर जवळपास २७ चालक काम करीत आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे रुग्णवाहिका चालकांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला.

यावेळी उपस्थित 102 रुग्णवाहिकाचे वाहन चालक मनोज आगळे, रविन्द्र अंबादे, उमेश गोलेपल्लीवार, भारत जिवने,  ओमकर मठपती, नवनाथ धोटे, सुधाकर रामटेके, चुडेश्वर खोब्रागडे, बबलु शेख, सुनील बोटरे, निखिल गंम्पलवार, रोहित जामदार, प्रशांत पिपरे, रवि शेंडे, सूभाष मेश्राम, नवनाथ धोटे, आनंदराव नागोसे, पवन भोसकर, प्रफुल ईटकेलवार, व्यंकटेश गेडाम, मनोज मेकर्तीवार, भारत बावणे, सूनिल बोटरे, शिवप्रसाद डांगे, आदी उपस्थित होते.