एवढी दिरंगाई का? आणि कशासाठी?; गोंड बुरांडा येथील निवड झालेल्या आशा वर्करला नियुक्तीची प्रतीक्षा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोंड बुरांडा येथील सीमा सुरज गमे यांची शासन निर्णयानुसार आशा वर्कर म्हणून निवड करण्यात आली. मात्र,गेली पाच ते सहा महिने लोटली तरी देखील संबंधित विभागाने त्या निवड झालेल्या आशा वर्करला कामावर घेत नसल्याने एवढी दिरंगाई का? आणि कशासाठी? असा प्रश्न सौ सीमा गमे ह्या उमेदवाराने प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला.

गोंडबुरांडा ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये ठराव क्र.2 च्या दि. 5/6/2023 ला घेण्यात आलेल्या मासिक सभे मध्ये दोन अर्ज प्राप्त झाले होते. त्या प्राप्त झालेल्या दोन अर्जा पैकी ठरवानुसार एकमताने सीमा सूरज गमे यांची निवड करण्यात आली. ठरवानुसार सूचक व अनुमोदक ह्या मासिक सभेचे प्रस्थापक होते. ह्या बाबी पुर्ण केल्या असताना संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणापासून दूर कां ठेवण्यात आले. असा आरोप केला आहे.

गोंड बुरांडा ग्रामपंचायत सचिव यांनी नियुक्ती पत्र न देता अचानक आशा निवड बाबतचा वरील नमूद ठराव रद्द करण्याबाबत पत्रक जारी केल्याने निवड झालेल्या सीमा गमे यांनी याबाबत निवड का? रद्द करण्यात आली, याबाबत लेखी अर्ज स्वरूपात माहिती दि.20/08/2023 ला  मागितली असता त्याचे आज रोजीपर्यंत माहिती पुरवली नाही,याबाबत गटविकास अधिकारी पं स व मुख्य अधिकारी जि प यांना प्रतिलिपी देण्यात आल्या.त्यानंतर त्यांना अशा आशयाचे स्मरणपत्र दिलेल्या 21/082023 रोजी च्यापत्रा बाबत 29 /3/2023 ला देण्यात आले. मात्र, अजूनही या प्रकरणात ग्रामपंचायत सचिव यावर कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात नसल्यामुळे या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत, तालुका आरोग्य विभाग यांना विचारपूस केली असता कोणीही बोलायला तयार नसून त्यांची नियुक्ती जाणूनबुजून देण्यास दिरंगाई केली जात आहे, अशी निवड झालेल्या उमेदवाराची तक्रार आहे.

शासनाच्या अटी आणि शर्ती नुसार त्यांची निवड योग्य असताना सुद्धा नियुक्ती पत्र देण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विलंब व टाळाटाळ का?करीत आहे. ह्या आशा वर्कर निवड प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तरीही गोंड बुरांडा ग्रामपंचायत सचिवाकडून कामावर रुजू करून घेण्यासाठी दिरंगाई होत असल्याने नेमके यांना कोण पाठीशी घालीत आहे तर नाही ना! असा सवालही उपस्थित होत आहे.