Showing posts with label नांदेड. Show all posts
Showing posts with label नांदेड. Show all posts

नादेड : दिव्यांगाच्या विविध प्रश्ना संदर्भात जिल्हा परिषद येधे उप मुख्यकार्यकारी अधिकारी विभाग यांच्या समवेत चंपतराव डाकोरे पाटिल शिष्टमंळाने घेतली भेट व चर्चा


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हातील सर्व गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष दि,१५ फ्रेबु २२ ते ५ मार्च २२ पर्यंत शिष्टमंडळाने निवेदनावर चर्चा करून निवेदन दिलेल्या प्रश्नाचे लेखी ऊतर न दिल्याने संघटनेच्या वतीने दिव्यांग तक्रार कक्ष, जिल्हाअधिकारी, मुख्यकार्यकारी जि.प. समाजकल्याण अधिकारी यांनी संघटनेचा संदर्भ देऊन लेखी आदेश दिले. तरी देखील गटविकास अधिकारी यांच्याकडून साधे ऊतर न मिळाले नसल्याने दिव्यांग तक्रार निवारण कक्ष यांच्यातर्फे सर्व कक्ष प्रमुख व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत जिल्हा परिषद नांदेड येथे दि ८ जुन २०२२ रोजी उप मुख्यकार्यकारी पंचायत विगाग मा केंद्रे सर, उप मुख्यकार्यकारी मनेरगा श्री पाटील सर,सामान्य प्रशासन कक्ष अधिकारी शेख सर, दिव्यांग कक्ष प्रमुख कुरेलु सर,वै, सामाजिक कार्यकर्ता दिव्यांग विभाग गोडगोलवार,जिल्हा ग्रा,विकास यंत्रणा श्री पेंदेवाड,दिव्यांग कनिष्ठ कक्ष सहाय्यक, श्रीनेहुलकर, दिव्यांग वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्टृ  अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली.
          
या बैठकीत डाकोरे पाटील यांनी दिव्यांग बांधवाच्या 
प्रश्नासाठी फ्रेबु २०८२२ ते जुन २०२२ पर्येत निवेदन,धरणे, ऊपोषण, करून आपण क वरीष्ठ अधिकारी लेखी आदेश देऊन कनिष्ठ अधिकारी आपले आदेश का पाळत नाही? त्याबदल सर्व कक्ष प्रमुखाना अनेक विभागाच्या प्रश्नाबदल चर्घा करण्यात आली व संबधितावर लगेच नोटीस काढण्याचे कक्ष प्रमुखानी अश्वासन दिले.
     
या बैठकीस जिल्हा परिषद मधील सर्व कक्ष अधिकारी, दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे पाटील, ईचांदराव घव्हाण, मुकावार, बेळगे, राजुभाऊ शेरकुरवार पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सह्याद्री | चौफेर न्यूज 
 
नांदेड : अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकऱ्यांसाठी कर माफी, शाळांच्या स्थापनेद्वारे विद्याप्रसार तसेच अंधश्रद्धा निवारण अशी अनेक समाजोद्धाराची कार्ये केली. न्यायनिष्ठ, दानशूर व अतिशय कर्तृत्ववान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक 31 मे 2022 रोजी समितीचे उपायुक्त तथा सदस्य मा. श्री. ए. एम. शेंदारकर साहेबयांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी मा. श्री. आ. ब. कुंभारगावे साहेब, (संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव), श्रीमती सुनीता शिंदे मॅडम (पोलीस निरीक्षक), एस. एम. मुळे, एस. जे. रणभीरकर, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, बाबू कांबळे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, अमोल वाकडे, संजय मंत्री लहानकर, अनिकेत वाघमारे, सुनिल पतंगे यांची उपस्थिती होती.


अवैध सावकारी लूट खपवून घेतली जाणार नाही – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : अवैध सावकारी लूट थांबविण्यासाठी कायदेविषयक जेवढे प्रावधान आहेत त्याचा काटेकोर वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून याला आळा घातला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारांनी कब्जा करून ठेवल्या आहेत, हडप केलेल्या आहेत त्या जमिनी मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत करण्याबाबत कायदाचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.

नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावळ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते, मार्केटिंग फेडरेशनचे उपसरव्यवस्थापक वीर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बाजार समितीचे सचिव व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा गाळपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे. हे गाळप 25 मे पूर्वी पूर्ण होण्याबाबत योग्य ती दक्षता व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रादेशिक सहसंचालक सचीन राव यांना दिल्या. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपासाठी 2021-22 या आर्थिक वर्षात एकुण लक्षांकाच्या 75 टक्के कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा बँकेने लक्षांकाच्या 87 टक्के कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्हा बँकेतर्फे दोन एटीएम व्हॅन व नवीन एटीएम कार्ड वाटप तसेच एटीएम उभारणीसाठी पुढाकार घेतला. प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा बँकेने 12 कोटी रुपयांचा नफा कमावला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

बाजार समितीच्या निवडणुका या वेळेवर झाल्या पाहिजे. याचबरोबर बाजार समित्यांनीही उत्पन्न वाढविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नांदेड येथे सहकार खात्यातील सर्व संबंधित कार्यालयांसाठी एक प्रशस्त इमारत, सहकार संकुल उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी उपनिबंधक नांदेड यांना सांगितले.

आपल्या मराठवाड्याचा माणूस कोविडसाठी देशाचे नेतृत्व करतो याचा अभिमान – पालकमंत्री अशोक चव्हाण


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : मराठवाड्यातला आपला भूमिपुत्र कोरोना सारख्या आजाराच्या संशोधनासाठी, या आजारातून सर्व देशवासियांना वाचविण्यासाठी संशोधनात स्वत:ला मग्न करून घेतो, या आजाराशी लढायचे कसे, या आजारापासून सुरक्षित राहायचे कसे याचे शास्त्रोक्त व सुत्रबद्ध पद्धतीने लोकांना बळ देतो, कोरोनासह आजवर असंख्य जीव घेण्या आजारातून नव्या लसीचे संशोधन देतो, असे आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री सन्मानित डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याप्रती प्रत्येकाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराची त्यांच्या माध्यमातून जी भव्य सुरूवात झाली आहे, विशेषत: या निवडीने पुरस्काराचाही गौरव झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या रौप्य महोत्स सोहळ्याचे उद्घाटन व श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कुसूम सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास पुरस्काराचे मानकरी पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, अपर्णा नेरळकर, पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

महानगरपालिका 25 वर्षांचा एक टप्पा पार पाडत असतांना मला एका आठवणीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ती आठवण आजही तेवढीच ताजी आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी तेंव्हा मनोहर जोशी होते. नांदेड वाघाळा महानगरपालिकेची घोषणा त्यांनी करून या महानगराच्या विकासाला नवे पर्व सुरू करून दिले. या विकासाच्या टप्प्यात भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरूत्ता गद्दी सोहळ्या निमित्त विविध सेवा-सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आता पालकमंत्री म्हणून, राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून निधीसाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला. त्यांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी जी पाठराखण केली त्यामुळेच आपण पुन्हा या महानगराच्या विकासासाठी सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांची कामे करू शकत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नांदेडकरांच्यावतीने मी आभार मानतो या शब्दात त्यांनी नांदेडच्या विकासाला अधोरेखीत केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पहिले नगराध्यक्ष म्हणून कारकिर्दपासून ते आजवर जो मैलाचा टप्पा आपण गाठू शकलो त्यात सर्वसामान्य लोकांचेही योगदान अधिक आहे, या शब्दात त्यांनी नांदेडकरांचे आभार मानले.

कोरोनाचा काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. पहिल्या लाटेतच मी बाधित झालो. उपचारासाठी मुंबईला जातांना लोकांच्या मनात एक धास्ती होती. अनेकांना ही भेट शेवटीचीच आहे की काय इथपर्यंत भीतीने गाठले होते. अशा काळात नांदेडचा भूमिपुत्र संपूर्ण देशाला कोरोनातून बचावासाठी दिलासा देतो, या आजाराची माहिती सांगून लोकांना धीर देतो, ही बाब अशाकाळात औषधापेक्षाही अधिक परिणामकारक होती, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगून पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांच्या कार्याला अधोरेखित केले. या काळात सगळ्यांना खूप काही सोसावे लागले. जिल्हा अधिक सुरक्षित रहावा यावर आम्ही नंतर अधिक दक्ष राहिलो. संपूर्ण जिल्हाभर कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी केंद्र उभारण्यावर आम्ही भर दिला. नांदेड महानगर हे वैद्यकीय क्षेत्रात प्रगतशील असल्याने स्वाभाविकच अप्रत्यक्षरित्या त्याचा ताण नांदेड वर आला. शेजारच्या जिल्ह्यातून रुग्ण येथे आले. अशा स्थितीत संपूर्ण जिल्हा प्रशासनची टीम, वैद्यकिय महाविद्यालय, महानगरपालिका, आरोग्य विभाग यांनी जे काम केले त्याला तोड नाही. एक जबाबदारीचे पर्व कोरेाना काळात आपण देऊ शकलो, याचा आवर्जून उल्लेख पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

नांदेड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन हे वाढत्या महानगराच्या गरजा लक्षात घेऊन काम करत आहे. यात अनेक पातळीवरचे प्रश्न आहेत. नागरीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेत ज्या समतेचा आग्रह डॉ. रमण गंगाखेडकर यांनी घेतला आहे त्या जेंडर समानता, तृतीयपंथीयांना अधिकार आदी नाजूक प्रश्न जिल्हा प्रशासनातर्फे संयमाने हाताळल्या जात असल्याचे सांगून लोकाभिमुख प्रशासनाची त्यांनी व्याप्ती व जबाबदारी स्पष्ट केली. डॉ. रमण गंगाखेडकर हे नव्या पिढीचे प्रेरणास्थान आहेत. मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान जरूर आहे. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचले जावेत, त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळावे यासाठी वेळोवेळी निमंत्रीत केले जाईल, असे ते म्हणाले.

शब्द निट सापडत नाहीत. कोणी सन्मान केला की जबाबदारीमध्ये आणखी वाढ होईल याची एक नकळत धास्तीही राहते. प्रत्येकांच्या मनाशी जवळकिता साधणाऱ्या या साध्या शब्दातून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आपल्या साध्या जीवन शैलीसह कर्तव्य तत्पर विचारसरणीला प्रवाहित केले. डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते. मनाच्या भावूक अवस्थेला सावरत त्यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद हा प्रत्येकजण टिपून घेत होता. जिल्हा परिषद शाळा, बिलोली, धर्माबाद येथील विज्ञान महाविद्यालय, अंबेजोगाई येथील वैद्यकिय महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील वैद्यकिय महाविद्यालयातील सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत हा पुरस्कार अप्रत्यक्षरित्या त्यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण भागालाच अर्पण केला.   

डॉ. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्व उत्तुंग होते. त्यांची बरोबरी कोणाला करता येणार नाही. माझे वडील याच जिल्ह्यात तहसिलदार असल्याने त्यांच्या बोलण्यातून शंकररावांप्रती सदैव नम्रतापूर्वक उल्लेख असायचा. ते नेहमी म्हणायचे “शंकररावांसारखी सचोटी कोणाजवळ मिळणार नाही” जिल्हा परिषदेच्या शाळेतून मी चांगल्या गुणांनी एसएससी उत्तीर्ण झालो. वडील म्हणाले “चल शंकररावांना भेटायला जावू” मी घाबरलो. तसाच घाबरत त्यांच्याकडे गेलो. त्यांच्यातला साधेपणा पाहून माझ्या मनातली भीती गळून पडली ते लक्षातही आले नाही. या भेटीची आठवण डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आवर्जून सांगत शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.

लहानपणी शिकत असतांना आपण फार काही पुढे मोठे होऊ असे काही निश्चित नव्हते. प्रामाणिकपणे शिकत राहिलो. विशेषत: शिक्षक जे काही सांगतील ते सर्व नम्रतेने ऐकत राहिलो. माझ्या जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांपासून ते पुढे वैद्यकिय महाविद्यालयापर्यंत व जिथे कुठे शिक्षणाचा संबंध येत राहिला तिथे मी गुरूजींच्या सांगण्याला प्राधान्य दिले. आज माझ्यात जे काही चांगले असेल ते गुरुजनांचे आहे. माझी सर्व मूल्य जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे घडली असे निसंकोचपणे सांगत त्यांनी गुरू जर चांगले भेटले नसते तर केवळ पैशाच्या मागे लागणारा डॉक्टर झालो असतो, असेही स्पष्ट सांगायला त्यांनी कमी केले नाही.

वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत असतांना विविध पातळ्यांवर काम करण्याची संधी मला मिळाली. यात एड्स संदर्भात कार्य करीत असतांना सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांपासून तृतीयपंथीयापर्यंत, विविध सेक्स वर्कर्स व तळागाळातील लोकांकडून पुस्तकांच्यापलीकडे शिकायला मिळाले. एड्सला नियंत्रण हे गोळ्या औषधांसमवेत वर्तणाशी निगडीत अधिक आहे. यासाठी लोकांना अगोदर समजून घेणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन त्यांचेही प्रतिनिधी एड्स कंट्रोल सोसायटीवर, संस्थांवर असले पाहिजेत यासाठी धरलेल्या आग्रहाचा त्यांनी उल्लेख केला. आयुष्यात मला प्रत्येक ठिकाणी मन मोकळे करणारी माणसे मिळाली. सेवाभावी संस्थांमुळे, समाजातील या जागृत लोकांमुळे मला पद्मश्रीचा सन्मान मिळू शकला अशी वस्तुस्थिती प्रांजळपणे त्यांनी सांगितली. पुरस्कारासाठी कुठेही अर्ज करणे मला भावले नाही. एक मात्र खरे की डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्काराने मला माझ्या पुढच्या आरोग्य क्षेत्रातील कामासाठी व समाजात जी असमानता आहे त्यावर काम करण्यास बळ मिळाले आहे, प्रेरणा मिळाली आहे असे पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

नांदेडच्या नगरपरिषदेपासून ते महानगरपालिकेच्या प्रवासातील विविध संदर्भांना उजाळा देणारा हा महोत्सव आहे. या महानगराच्या विकासातील कटिबद्धतेला, योगदानाला अधोरेखीत करणारा हा उत्सव आहे. डॉ. शंकरराव चव्हाण हे या नगराचे पहिले नगराध्यक्ष राहिले असून विकासाचा त्यांनी घातलेला पाया हा तेवढाच भक्कम असल्याने या शहराच्या विकासातील काळानारूप निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आपल्या महानगरपालिकेत, पालकमंत्री अशोक चव्हाणा यांच्या नेतृत्वात असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.

यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर पद भूषवून योगदान देणाऱ्या सर्व महानुभवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर जयश्रीताई पावडे यांनी केले तर आभार मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी मानले.


नांदेडच्या प्रवेशद्वारावरील समतेचा विचार जागराचे हे प्रेरणास्थान – पालकमंत्री अशोक चव्हाण  

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकाच्या कालखंडात सामाजिक समतेचा दिलेला संदेश हा तेवढाच आद्य मानला पाहिजे. त्या कालखंडातील समाजाच्या ज्या धारणा होत्या त्याला सामाजिक न्यायाच्या तत्वावर आणून परिवर्तनशील विचार त्यांनी दिला. समाजासाठी स्वत:ला वाहून घेत समाजाच्या मनपरिवर्तनाचे महान कार्य महात्मा बसवेश्वर यांनी केले आहे. त्यांचे जीवन कार्य संपूर्ण जगाच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जगाचे सामाजिक नेते असा जर उल्लेख केला तर तो चुकीचा ठरणार नाही. त्यांना मानणारा वर्ग हा व्यापक असण्याचे कारण त्यांनी जपलेले सामाजिक समतेचे तत्व आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

नांदेड महानगराच्या वैभवात भर टाकणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, हरिहरराव भोसीकर, दत्ता पाटील कोकाटे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, माजी सभापती संजय बेळगे, प्रा. मनोहर धोंडे, किशोर स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपुरुषांच्या जीवन कार्याचा विचार समाजापर्यंत पोहचावा यादृष्टीने नांदेड महानगरात आपण निवडक ठिकाणी त्यांचे पुतळे व परिसर सुशोभीकरण केले. महापुरुषांची पुतळे हे समाजाला अव्याहत प्रेरणा देत असतात. त्यांच्या विचाराचा जागर हा सातत्याने समाजापुढे जावा हा उद्देश आपण यापाठीमागे बाळगला आहे, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारुढ पुतळा साकारून नांदेड मधील सर्व जनतेच्यावतीने अभिवादन करावे हे माझे स्वप्न होते. ते साकारतांना मधल्या काळात काही अडचणी आल्या. या अडचणींवर मात करून नांदेड महानगरात प्रवेश करतांना प्रवेशद्वारावरच महात्मा बसवेश्वरांच्या या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादाना समवेत ते समतेच्या विचार जागराचे प्रतिक व प्रेरणास्थळ म्हणून याकडे पाहिले जाईल, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

सर्वांच्या प्रयत्नांतून आणि सहकार्यातून आपण हा पुतळा, हे प्रेरणा स्थळ या ठिकाणी आपण उभारू शकलो या धारणेतून मी पाहतो आहे. श्रेयाचा इथे प्रश्न नाही उलट सगळ्याच्या हातभाराचे हे एक प्रतीक आहे. या प्रतिकासाठी माझ्यापरीने जेवढे शक्य आहे तेवढे करण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न केला, या शब्दात त्यांनी महात्मा बसवेश्वरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा आवर्जून उल्लेख करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठबळावरच अधिक खंबीरपणे उभे राहता आले.

लिंगायत समाजाच्या प्रश्नांबद्दल मी दक्ष आहे. समाजापुढे असलेल्या अडचणींची मला कल्पना आहे. एक पालक या नात्याने मी जबाबदारी स्विकारायला तयार असून हे प्रश्न मार्गी लावील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. आपला जिल्हा हा तेलंगणा, कर्नाटक या राज्याच्या सिमेवरचा आहे. मराठवाडा मुक्तीनंतर आपण विनाअट महाराष्ट्रामध्ये सहभागी झालो. इथल्या सामाजिक प्रश्नांचा पोत हा वेगळा आहे. हा पोत समजून घेतल्या शिवाय त्या-त्या समाजाचे प्रश्न आपल्याला कळणार नाहीत. आपण विनाअट महाराष्ट्रात सामील होऊन येत्या वर्षात ७५ वर्षे होत आहेत. हा अमृत महोत्सव मराठवाडा मुक्ती समवेत आपल्या योगदानाचाही आहे, याकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील समाधान हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत माझे नांदेड मला अधिक सुरक्षित हवे आहे, असे स्पष्ट करून त्यांनी सामाजिक सलोखा व जनतेच्या सुरक्षिततेला अधिक महत्व दिले.

महात्मा बसवेश्वरांनी समतेच्या लढ्यासह “सदाचार हाच खरा धर्म” ही शिकवणूक दिली आहे. ही शिकवणूक आचारणात आणून त्यांचा विचार समाजातील प्रत्येकाने दृढ केला पाहिजे. त्या काळात जाती-धर्माच्या नावावर असलेली अधिक घट्ट पकड लक्षात घेता महात्मा बसवेश्वर यांनी समतेचे जे विचार दिले ते आजही तेवढेच लाख मोलाचे आहेत. सर्वांसोबत व सर्वांना घेऊन चालण्याची शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे. लोकशाही मूल्यांची शिकवण यात असल्याचे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, शिवा संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे, ईश्वराराव भोसीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. श्री. श्री. १००८ केदारपीठ जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपले आशीर्वाद वचनपर मार्गदर्शन केले.

दिव्यांगाच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री,अर्थमंत्री अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांची निवेदनाद्वारे मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
      
नांदेड : दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सामाजिक न्याय मंञी, राज्याचे सचिव यांना निवेदनाद्वारे मंञालय मुंबई येथे अर्थसंकल्प अधिवेशनात भरीव तरतूद करुन दिव्यांगाचे पुनर्वसन करावे अशा आशयाचे लेखी निवेदन सादर केले. 
        
दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्क मिळावा व त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून शासनाने २०१६ ला दिव्यांग हक्क कायदा अंमलात आणला व अपंग हा शब्द व व्यंगावर न बोलता त्यांना मानसन्मान मिळावा म्हणून शासनाने दिव्यांग या शब्दाने सन्मान केला त्याबदल शासनाचे धन्यवाद! आहे.
          
दिव्यांगाना सन्मानाने जीवन जगण्यासाठी अनेक सवलती व जाहिर केले जातात पण प्रशासन शासन निर्णय कायदा कागदावरच ठेवला जातो त्यांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात मंञी महोदय यांनी भरीव तरतूद करून दिव्यांगाना हक्क दिल्यास दिव्यांग बांधव सर्व सामान्य जनतेसारखे जीवनाचा आनंद घेतील.

संसदेत केलेला कायदा आपलेच लोकप्रिय आमदार पालन करीत नाहित. दर वर्षी आमदार निधी दिव्यांग बांधवांसाठी वैयक्तिक खर्च करुन विकास करावा असा कायदा शासन निर्णय आपलेच आमदार प्रशासन पाळत नसतील तर दिव्यांगाचा विकास कसा होईल. मा. आमदार यांनी दिव्यांगासाठी राखीव असलेला आमदार निधी दर वर्षी त्यांच्या मतदार संघात दिला तर दिव्यांगाना भिक मागण्याची वेळ येणार नाही यांचा विचार करावा. असे निवेदनात नमूद आहे.
मा. मंत्रीमहोदय साहेब दिव्यांगासाठी अनेक घोषणा केल्या जातात पण त्या खात्याला आर्थीक भरीव तरतुद केली जात नसेल व प्रशासनास दिव्यांगाच्या सवलती अंमलबजावणी केली जात नसेल तर दिव्यांग हक्क कायदा,शासन निर्णय चा दिव्यांगाना काय ऊपयोग ?
2) दिव्यांग बांधवांसाठी असलेले दिव्यांग महामंडळ यांना भरीव आर्थिक तरतूद करून दिव्यांगाचा विकास करावा. 
3) दिव्यांगासाठी शासनाने कायद्यात मान सन्मान मिळावा म्हणून अपंग हा शब्द वगळून दिव्यांग शब्दाने सन्मान केला पण नुसता सन्मानाने दिव्यांगाचे पोट भरत नसल्यामुळे त्यांना अन्न, वस्ञ, निवारा या मुलभुत गरजा तरी विचार करून त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून राज्य सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशन मध्ये सर्व खात्यात भरीव आर्थिक तरतूद केली तरच दिव्यांग कायदाहक्क अंमलात आला असे होईल व दिव्यांगाना आधार मिळेल.
     
तरी मा मंञीमहोदय यांनी या निवेदनाची विचार करावा न्याय हक्क द्यावा असे लेखि निवेदन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल राज्य सचिव मनोज कोटकर यांनी दिले.

नांदेड खासदारांच्या मतदार संघात दिव्यांगाच्या विकासाठी दर वर्षी विस लाख निधी देण्याची तरतुद असतांना पाच फक्त लाख निधी उपलब्ध - चंपतराव डाकोरे पाटील यांनी केली खंत व्यक्त

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नांदेड : संसदेत अनेक कायदे सत्तेत गेलेले खासदार मंजुर केले जातात पण, तेच खासदार कायद्याची अंमलबजावणी दिनदुबळ्या जनतेसाठी केली जात नाही? अशी खंत चंपतराव डाकोरे पाटील यांनी व्यक्त केली. 
   
दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसासारखे जीवन जगता यावे म्हणून शासन अनेक कायदे करून अमलात आणत आहे. मात्र, प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे अनेक दिव्यांग वंचित राहाव लागत असल्यामुळे भारत सरकारने २०१६ ला दिव्यांग कायदा संसदेत मांडला. तसेंच निवडणुकीदरम्यान जाहीर वचन देऊन तेच अंमलबजावणी करीत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अनेक संघटनेने शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप न्याय मिळाला नाही.

विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मा.प्रतापराव पाटील यांना 'दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र' संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक मध्ये जाहिर पाठिंबा दिला. त्यावेळी जाहीरनामा पांठिबा पञक मध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेला खासदार निधी देण्याचे जाहीर अश्वासन चिखलीकर यांनी दिल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड च्या वतीने गावोगावी जाऊन प्रचार केला व भरगोस बहुमताने सत्तेत पाठविले. मात्र, तिन वर्षाचा अनुशेष सहित दिव्यांग बांधवांचा खासदार निधी नियमाप्रमाणे दरवर्षी विस लाख रुपये प्रमाणे तिन वर्षाचा ६० लाख देण्याऐवजी फक्त ५ लाख रुपये निधी प्रशासनाकडे जमा केला आहे. त्या निधीतून दिव्यांगाना साहित्य देण्याची तरतूद केलेली आहे. ही तटपुंजी निधी असल्याचे डाकोरे पाटील यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाना चालता येत नसल्यामुळे बॅटरीद्वारे तिन चाकी सायक़ल मिळावी म्हणून शेकडो दिव्यांगानी पडत झडत जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या कडे अर्ज सादर केले असता त्याची प्रशासनाने छाननी करुन फक्त ७७ दिव्यांगाना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलाऊन त्यांच्या मुलाखती दि ८ फेब्रुवारी २०२२ ला घेण्यात आल्या. 

जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगानी वाहन करून शेकडो रू खर्च करून कशाबशा मुलाखती दिल्या. त्यात फक्त दहा दिव्यांगाना पाच लाख रूपये निधीचा लाभ होईल? जर खासदार साहेबांनी नियमाप्रमाणे दर वर्षी विस लाख रुपये मागील तीन वर्षाचा अनुषेश सहित निधी दिला असता तर दिव्यांगाना त्यांचा हक्क मिळाला असता पण, संसदेत कायदे मंजुर करणारे सत्तेत गेलेले लोकप्रतिनिधीच कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्याची खंत दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, राजु शेरकुरवार, ऊमेश भगत, माधवराव डोईफोडे, हानिफ शेख, बालाजी होनपारखे, रामजी गायकवाड, तानाजी कदम, बालाजी राठोड इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे दिली.

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो....

                      प्रजासत्ताक_दिन

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन.बाबासाहेबांना वंदन करत ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


शुभेच्छुक : सौ सीमा स्वामी लोहराळकर
भ.ज.वि.अ.महा. राज्य मराठवाडा उपकार्याध्यक्षा, नांदेड 

 

सौ सावित्रीताई लकुले यांची महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नांदेड : भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य समिती च्या महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष पदी तालुका-जिल्हा नांदेड च्या सावित्री प्रल्हाद लकुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर निवड संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश उत्तमराव जाधव यांनी दिले आहे.

या नियुक्ती बद्दल जिल्हा सचिव संदीप वानखेडे, मराठवाडा कार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर, महिला जिल्हा सचिव कविता डोनेकर, प्रसिद्धी प्रमुख आनंद सोनटक्के, सदानंद गजभारे सर, अर्चना शर्मा, प्रणिता जोशी, प्रणिता देशमुख, रंजनी मडपल्लेवार, परमेश्वर सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष), स्वातीताई कुलकर्णी, विजयाताई काचावार, व्‍यंकटी नरबाजी मोरे (जिल्हा संपर्क प्रमुख), श्री दादाराव खंदारे (तालुका अध्यक्ष हदगांव), यांच्या सह नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याच्या वतीने सौ सावित्री लकुले यांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

किनवट-माहूर तालुक्यातील शिक्षण व पाटबंधारेच्या कामांना प्राधान्य – पालकमंत्री अशोक चव्हाण

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नांदेड : डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मंजूर असून या पैकी 2 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून किनवट व माहूर तालुक्यातील शाळा बांधकाम-दुरुस्तीची व पाटबंधारेची कामे प्राधान्याने करावीत असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज डोंगरी विकास समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते.

डोंगरी भागातील गावात रस्ते, नाली बांधकाम व इतर विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. डोंगरी भागातील नदी-नाल्याच्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व पुरात होणारी जीवीत हानी टाळण्यासाठी कोकणाच्या धर्तीवर पायी चालण्यासाठी राज्यात गरज असेल तिथे साकव उभे करण्याचा कार्यक्रम बविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेखा काळम, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे, समाज कल्याण अधिकारी तेजस माळवदकर, समितीच्या अशासकीय सदस्य श्रीमती जनाबाई डुडुळे, सदस्य आशिष कऱ्हाळे, राहूल नाईक तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या 512 कोटी 4 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नांदेड : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन 2022-23 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 512 कोटी 4 लाख 72 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, समिती सदस्य हरिहरराव भोसीकर, एकनाथ मोरे, प्रकाश वसमते, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने हे प्रत्यक्ष तर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार राजेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, आमदार डॉ. तुषार राठोड व नियोजन समितीचे इतर सदस्य हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

सन 2022-23 च्या प्रारुप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी 303 कोटी 52 लाख 80 हजार, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 163 कोटी, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजनेसाठी 45 कोटी 51 लाख 92 हजार रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय चालू वर्षातील पुनर्विनियोजन प्रस्तावात बचत 9 कोटी 11 लाख 55 हजार असून मागणी 86 कोटी 25 लाख 49 हजार रुपयांची आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या पुनर्विनियोजन प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील कार्यान्वित यंत्रणाना वितरीत केलेला निधी माहे डिसेंबर 2021 अखेर एकुण वितरीत तरतुद 86 कोटी 60 लाख 34 हजार रुपयांपैकी झालेला खर्च 63 कोटी 56 लाख 20 हजार रुपये एवढा झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वितरीत निधी व खर्च झालेल्या निधीचा आढावा घेतला. ज्या विभागांनी अद्याप पर्यंत निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले नाहीत त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. निधी प्राप्त करुन मार्च 2022 अखेरपर्यत 100 टक्के प्राप्त निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना यावेळी दिले.

सन 2022-23 च्या प्रस्तावित प्रारुप मागणी आराखडा व सन 2021-22 या वित्तीय वर्षातील मंजूर निधीचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला. जिल्ह्यात पशुच्या संख्येचे निकष ठरवून पशुवैद्यकीय दवाखाने उभारणी व अद्ययावतीकरण करण्यावर भर द्यावा. देगलूर नाका परिसरातील पशुवैद्यकीय दवाखाणा अद्ययावत करणे, जिल्ह्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळांचे बांधकाम प्राध्यान्याने करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाला दिले. कोविड-19 उपाययोजनेसाठी आवश्यक तो निधी राखीव ठेवण्यात यावा. अनेक विभाग प्रमुखांनी प्रलंबित कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राप्त निधी मार्च अखेर खर्च करण्याची कार्यवाही पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. मागील 14 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास यावेळी मान्यता देण्यात आली.

बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. काळम यांच्यासह समिती सदस्य, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन व सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले.

परमेश्वर सूर्यवंशी यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नांदेड : भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्यच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील परमेश्वर लक्ष्मणराव सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर निवड संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र राज्य प्रदेश उपकार्यध्यक्ष अमोल दिलीपराव सोळंके यांनी दिले आहे.

या नियुक्ती बद्दल जिल्हा सचिव प्रदीप वानखेडे, मराठवाडा उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर, महिला जिल्हा सचिव कविता डोनेकर, प्रसिद्धी प्रमुख आनंद सोनटक्के, सदानंद गजभारे सर, अर्चना शर्मा, संगीता झिंजाडे, प्रणिता जोशी, प्रणिता देशमुख, रंजनी मडपल्लेवार यांच्या सह नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याच्या वतीने श्री सूर्यवंशी यांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जनजागृती करून 'राष्ट्रीय ग्राहक दिन' साजरा करावा - सीमा स्वामी लोहराळकर

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नांदेड : 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन चार भिंतीच्या आत साजरा न करता जनजागृती करून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात यावा. अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समितीतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

त्यात म्हटले की, भारतात दरवर्षी ता.24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. 1986 मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन 1991 आणि 1993 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002 मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्तीकरण्यात आली.

यानंतर 15 मार्च 2003 पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि, या कायद्यातसुद्धा 1987 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली.

2000 मध्ये प्रथमच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला होता. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन चार भिंतीच्या आत साजरा न करता जनजागृती करून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात यावा. असे मत भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश समिती च्या मराठवाडा उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी पत्रकात केले. आजच्या दिवशी ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळावी आणि ते याबाबत जागरूक व्हावेत यासाठी अनेक उपक्रम राबवले जावेत अशी मागणी आमच्या संघटनेची आहे असेही त्या पत्रकात नमूद केलं.

शासन प्रशासनास दिव्यांग वृध्द निराधार यांच्या हक्काची जानीव व्हावी म्हणून गाव तिथे दिव्यांग शाखेची स्थापना अंतर्गत धामणगाव येथे फालकाचे अनावरण


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मुखेड : तालुक्यातील धामणगाव येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या शाखेचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर व धामणगाव चे सरपंच विनोद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
             
गावकर्‍यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मा चंपतराव डाकोरे पाटिल, जि अध्यक्ष ज्ञानेश्वर, नवले जी संपर्क प्रमुख नागोराव बंडे, ता अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर, सरपच, ग्रामसेवक, तंटामुक्त चे अध्यक्ष,पाहुण्याचा गावकऱ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
        
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांच्या हक्काच्या सवलती व निधीची चोरी होऊ नये,दिव्यांगाना अपमानकारक वागणूक मिळु नये, त्यांना मान सन्मान मिळावा व दिव्यांगाच्या हक्काची जानिव शासन प्रशासनास व्हावी, म्हणून गाव तिथे शाखा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गाव तेथे शाखा अभियान चालु असुन तळागाळातील दिव्यांग, वृध्द, निराधार बांधवांना संघटित करुन शासन प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी गाव तेथे शाखा स्थापन करून संघटितपणे लढाईत सामिल व्हावे असे डाकोरे पाटिल यांनी आव्हान केले.
      
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुखेड ता अध्यक्ष आर एम कांबळे, ता.सचिव हनमंत हेळगिरे, सर्कल प्रमुख मानसिंग वडजे, शाखा प्रमुख दुर्गाजि दाबनवाड, संतोष हेळगिरे, माधवराव वानोळे, श्रीपत सोनकांबळे, अंकिता वडजे, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 

नुतन देगलुरचे आमदार अंतापुरकर यांनी आपले वडील यांनी दिव्यांगासाठी राखीव असलेला दिव्यांग निधी देण्याचे बिलोली येथील दिव्यांग शिबिरात दिलेले आश्वासन पूर्ण करतील काय? - अनिल रामदिनवार यांनी केली निवेदनातून मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नांदेड : दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा चंपरतराव डाकोरे पाटिल यांच्या आदेशानंतर बिलोली देगलुर चे नुतन आमदार मा अंतापुरकर यांची दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र ता देगलुर चे ता अध्यक्ष अनिल रामशेटवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन दिव्यांग बांधवांसाठी राखीव आमदार निधी आपल्या मतदारसंघात 3 डिसेबर दिव्यांग जागतिक दिनी वाटप करावा म्हणून निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे.
    
१) शासन निर्णय नियोजन विभाग मंञालय मुंबई क्र स्थाविका - 0616/प्र क्र.96/1482 दि.12/7/2016

२) जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी नांदेड जा व क्र.नियो/अस्थाविका/का-6/21/22/1461 दि.24/11/21

वरिल शासन निर्णय व जिल्हा नियोजन समिती यांच्या पञानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 दिव्यांगासाठी अनुज्ञेय कामे आपल्या मतदारसंघात दहा लक्ष निधी दिव्यांगासाठी शासन निर्णय 1 प्रमाणे खर्च करू शकतात तरी दिव्यांगासाठी असलेला निधी खर्च करून दिव्यांगाना आधार द्यावा.     
महाराष्ट्र शासन दिव्यांग हा सर्व सामान्य जनतेसाठी जीवन जगता यावे म्हणून शासन 2016 ला दिव्यांग कायदा करुन अनेक शासन निर्णय वरिष्ठ आदेश असुन संसदेत कायदा करणारे खासदार, आमदार यांनीच अंमलबजावणी करित नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून शासन प्रशासनाचे लक्ष व अनेक आमदार यांना निवेदनाद्वारे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न चालू असुन, देगलुर मतदार संघाचे नुतन आमदार अंतापुरकर यांना ता अध्यक्ष अनिल रामदिनवार यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिव्यांग आमदार निधीची  मागणी केली.
     

मुखेड तालुक्यातील शाखा बेटमोगरा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र बोर्डाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर व माजी आमदार हंनमतराव पाटिल बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुखेड : दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र या बोर्डाचे उदघाटन माजी आमदार हंनमतराव पाटिल बेटमोगरेकर, संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी बोर्डाचे अनावरण व मेळावा संपन्न झाला.

प्रथम दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र बोर्डाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटिल बेटमगरेकर मेळाव्याचे मार्गदर्शक दिव्यांग सस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले जिल्हा सं. प्रमुख नागोराव बंडे पाटिल यांचा शाल पुष्पहार घालुन सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आला. 
              
मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी 109 सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत करिता गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन करून संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळणार नाही. दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून "दिव्यांग होने का गम नही हम किसी से कम नही" हे दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे संघर्ष करून दिव्यांगाना मिळणाऱ्या चाळीस सवलतीसाठी गाव तेथे दिव्यांग संघटनेच्या शाखा स्थापन करून दिव्यांगाची शक्ती निर्माण करून कुंभकर्ण शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी बोर्डाचे स्थापना करावी असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले. 
    
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मी आपल्या पाठिशी असुन ग्रामपंचायत निधी व घरकुल ईत्यादी प्रश्न त्वरीत सोडविण्यासाठी सरपच ग्रामसेवक यांना सुचित केले दिव्यांग बांधवांना कोणत्याही अडचणी असेल तर त्यांनी कोणत्याही वेळी मी आपल्या पाठिशी असल्याचे अश्वासन दिले. 
  
कार्यक्रमास मुखेड ताअध्यक्ष रामकिसन कांबळे, मानसिंग वडजे, शाखा प्रमुख पांडूरंग सुर्यवंशी शा उपप्रमुख सुनिल चौधरी, शाखा सचिव बाबु फुलारी, शाखा सहसचिव बाबु कांबळे, शाखा कोषअध्यक्ष सलाम दौलताबादी तोटरे, नवले चापलवाड, देशमुख
ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिध्दी पञक सलिम दौलताबाद यांनी दिली.

भावी शिक्षकांची वाट बिकट! परिक्षा परिषदेची मनमानीमुळे शेकडो भावी शिक्षक टीईटी पासुन वचिंत राहण्याची शक्यता


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नांदेड : येत्या 21 नोव्हेबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिक्षक पात्रता परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.राज्यभरातील लाखो विद्यार्थी सदर परीक्षा देणार आहेत. परंतु,सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा संप तीव्र झाल्यामुळे अनेक परीक्षार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचन्यासाठी मोठी गैरसोय होणार आहे.सदर परीक्षा जवळपास चार वर्षानंतर होत असल्याने अनेक भावी शिक्षक परिक्षेसाठी अहोरात्र अभ्यास करत आहेत. मात्र एस. टी. संपाचा परीक्षा परिषदेने गांभीर्याने विचार विचार करून रविवारी होणाऱ्या परिक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा परीक्षार्थी करत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक डि.एड.बी.एड पात्रताधारक शिक्षक पात्रता परिक्षेच्या अटीनमुळे नोकरीविना वंचित असून येणाऱ्या परिक्षेला पोहचन्यासाठी अपयश आल्यास खूप मोठे नुकसान होणार आहे. सदर परीक्षा वेगवेगळ्या कारणांसाठी तब्बल तीन वेळा पुढे धकलण्यात आली आहे. पण यंदाच्या परीक्षा वेळापत्रकाला प्रवासाची मोठी अडचन निर्माण झाली आहे. जर परीक्षा घेतली गेली तर अनुपस्थित विद्यार्थ्यांना याची फार मोठी किंमत चुकती करावी लागणार आहे.म्हणून परीक्षा परिषदेने तातडीने निर्णय घेऊन भावी शिक्षकांना दिलासा द्यावा,ही प्रमुख मागणी परीक्षार्थी करत आहेत.
एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खाजगी वाहतूकीची सध्याची भाडेवाढ सर्व सामान्यांना परवडणारी नाही. प्रत्येक परीक्षार्थी हा सधन कुटुंबातील नसल्याने परिक्षेला जाण्यासाठी यांना मोठा मानसिक आणि आर्थिक भुर्न्दड सहन करवा लागणार आहे. कारण खाजगी वाहतूक या गोष्टिचा विचार करून वारेमाप भाडे आकारुन शकतात.हे नाकारुन चालणार नाही. परीक्षा अगदी तोंडावर येवूनसुद्धा कोणताच निर्णय घेतला जात नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मागील वेळी देगलूर मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी सतर्कतेने वेळापत्रक बदल करणारी परीक्षा परिषद आता का मूग गिळून गप्प बसली आहे,हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित शालेय शिक्षण विभागाला यावर तोडगा काढण्याची मागणी तुषार देशमुख यांनी केले.

सध्या एस.टी कर्मचार्यांच्या संपामुळे बस बंद आहेत रविवारी परिक्षेला जाण्यासाठी अनेक खेडोपाड्यातून परिक्षार्थी येणार आहेत या गोष्टीचा परीक्षा परिषदेने गांभीर्याने विचार करावा याआधीही बिलोली देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे परीक्षा पुढे ढकलली जाते मात्र आता कोणताच निर्णय घेतला जात नाही ही भावी शिक्षकांची मोठी कुचेष्टा आहे येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेला अनेक महिला व मूली परीक्षार्थी बसणार आहेत वाहतुकीची मोठी गैरसोय होणार असल्याने पालक परिक्षेला पाठवण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे खूप मोठे नुकसान होणार आहे, त्याकरिता राज्य परिक्षा परिषदेने तत्काळ मार्ग काढावा असेही युवाशाही संघटनेचे तुषार देशमुख यांनी केले.

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीदिनी अंजनी येथे विनम्र अभिवादन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

नांदेड : तालुक्यातील मौजे अजनी येथे मानव हित लोकशाही पक्षाच्यावतीने लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.

दिनांक १४ नोव्हेंबर रोजी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला विजय भरांडे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मानवहीत लोकशाही पक्ष तालुका अध्यक्ष विजय भरांडे, बहुजन युथ पँथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, राहुल पवार, किसन कांबळे, अविनाश भराडे, उद्धव गावंडे, बाबूभरांडे, राजेंद्र गावंडे, सदा भरांडे, वाघमारे आदमपुरकर इत्यादीची उपस्थिती होती.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शांततेचे आवाहन


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नांदेड : नोव्हेंबर- त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात महाराष्ट्रात काही ठिकाणी तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. चव्हाण म्हणाले की, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले आहेत. निषेध नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे आहे. या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेचे पालन करावे, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

एस टी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे - सीमा स्वामी

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

नांदेड : सणासुदीच्या काळामध्ये सुरु असलेल्या राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य शासनाने तातडीने भूमिका घेत त्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे अशी आग्रही मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी परिवहन मंत्री यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
उपकार्याध्यक्षा यांनी केलेल्या मागणीत म्हटले की, एस टी महामंडळा च्या विषयांकित मागणी बऱ्याच वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असून त्यांची मागणी रास्त आहे. याचा शासनाने तात्काळ विचार करून त्यांची मागणी मान्य करावी.
एस टी कर्मचारी हे सणासुदीच्या काळात व अत्यंत अडचणीच्या काळातही रात्रंदिवस काम करत असतात.
त्यांचे वेतनही अल्प असते.त्यांची होणारी वार्षिक वेतनवाढही अल्प असते. म्हणजे कामाच्या मोबदल्यात त्यांना पुरेसा मिळत नाही. याशिवाय आर्थिक परिस्थितीमुळे एस टी महामंडळ जे पगार करते ते पगार वेळेत होत नाही. असा सर्व बाजूनी एस टी कर्मचारी सापडले आहेत. त्यामध्ये अनेकांची आर्थिक कुचंबणेमुळे कुटुंबाचे हाल होत आहेत. आर्थिक विवंचनेमुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केले आहेत. अत्यंत दु:खदायक आहे. अशावेळी महाराष्ट्र शासनाने तातडीने पुढाकार घेत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साहेब यांच्या मार्फत मा. परिवहन मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे.
स्वामी यांनी केलेल्या या मागणीबाबत एस टी आगार व्यवस्थापक साहेब नांदेड व एस टी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश च्या सीमा स्वामी लोहराळकर यांचे अभिनंदन केले.