टॉप बातम्या

वणी शहरात आदिवासी समाज बांधवांची भव्य बाईक रॅली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त शनिवार दि. 9 ऑगस्ट ला आदिवासी समाज बांधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली राजूर कॉलरी येथून भीमालपेन देवस्थान वणी येथे पोहचली. या ठिकाणी शहरातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन ही बाईक रॅली मार्गक्रमण करत निघाली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून, साई मंदिर चौक ते टिळक चौकात येवून पुढे गांधी चौक, भगत सिंग चौक तसेच घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जावून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन धर्मनिरपेक्षतेचा नारा देण्यात आला. 

त्यानंतर आदिवासीचे दैवत भीमालपेन देवस्थान येथे ही भव्य रॅली पोहचली. उपस्थित सर्व समाज बांधवाना जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम, सामाजिक कार्यकर्ते सुभाष आडे, सौ.माया ताई मरस्कोल्हे, श्री.संतोष चांदेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी असंख्य आदिवासी बांधवांची उपस्थिती होती.
 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ॲड.अरविंद सिडाम यांनी केले. या कार्यक्रमांची सांगता शेवटी आदिवासी संस्कृतीप्रमाणे सामूहिक नृत्य सादर करून करण्यात आली. 

Post a Comment

Previous Post Next Post