वाघाच्या हल्ल्यात निष्पाप युवक ठार, भुरकी शेतशिवारातील घटना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
7218187198

वणी :
तालुक्यातील भुरकी येथील एका युवकाचा वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना उघडीस आली. सदर घटना दुपारी 5. ते 5.30 च्या सुमारास घडली.

अभय मोहन देऊळकर (25) रा. भुरकी असे मृतक युवकाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे मृतक हा भुरकी मनगाव शेतशिवारात असलेल्या आपल्या शेताच्या परिसरात जनावरे चारत असतांना अचानक वाघाने चढवीला यात पंचवीस वर्षीय युवक जागीच ठार झाल्याचे माहिती समोर आली.
निष्पाप बळी गेलेल्या युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी असे बोलल्या जात असून या परिसरातील मोकाट वावर असणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मनगाव भुरकी परिसरातील नागरिकांची आग्रही मागणी आहे.