सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सार्वजनिक बांधकाम विभागातील माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीस विलंब होत असल्यामुळे संबंधित वरिष्ठ लिपीकेवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाकडे केली आहे.त्याबाबतची माहिती तक्रार कर्ते मोहब्बत खान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक 7 ऑगस्ट ला येथील शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या परिषदेत अर्जदार मोहब्बत खान सत्तार खान यांनी माहिती दिली.
दि.14/07/2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग वणी येथे माहितीच्या अधिकारातुन मागीतलेल्या माहितीबद्दल अर्जदार मोहब्बत खान हे विचारायला गेले असता संबंधित वरिष्ठ महिला लिपिक ह्या अनुपस्थित होत्या, त्यामुळे वारंवार माहिती मिळवायला विलंब होत असल्याने अर्जदाराने त्यांना थेट संपर्क साधून आपल्या अर्जाबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. याबाबतची माहिती पत्र परिषदेत दिली.
पुढे पत्रकारांच्या प्रश्नउत्तराला सामोरे जाताना त्यांनी याबाबत आपल्याकडे सर्व एविडंस (पुरावे) असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सदर लिपीकेवर काय कारवाई होतात, याकडे लक्ष लागले आहे.