टॉप बातम्या

पाण्यात बुडून तीन युवकांचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील वांजरी (मजरा) येथे खदाणीच्या खुल्यातळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळ पासून पाण्यात बुडालेल्या त्या तीनही युवकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते.

तालुक्यातील वांजरी येथे लाईमस्टोन खाणीच्या तळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शंका काल दुपारनंतर त्याठिकाणी आढळून आलेल्या मोफेड गाडी व कपडे यावरून आल्याने गावाकऱ्यांनी तलावाच्या ठिकाणी एकच गर्दी केली. मात्र संध्याकाळ झाल्याने त्या तलावात बुडालेल्या युवकांचा शोध घेणं अवघड असल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली, तेव्हा पोहायला गेलेल्या तीनही युवकांचा मृतदेह तलावतील पाण्यात तरंगत असताना आढळून आला, पोलीस व गावाकऱ्यांच्या मदतीने सदर बुडालेल्या त्या तीनही युवकाचे मृतदेह बाहेर काढले. मृतक आसीम अब्दुल सलाट शेख (16), नुमान शेख सादिर शेख (16) राहणार एकता नगर,  प्रतिक संजय मडावी (16) रा. प्रगती नगर असे नावे असलेल्या या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी मोपेड दुचाकी क्रमांक MH-29-Y-5342 वरुन तीन तरुण वांजरी परिसरात गेले होते.

वांजरी (मजरा) गावाच्या हाकेच्या अंतरावर लाईमस्टोनची बंद पडलेल्या अवस्थेतील मोठी खोली असलेली खदान आहे. त्यात दरवर्षी निसर्गाचे पाणी साचून तलावाचे मोठे स्वरूप आलेले आहे. तिनही नवयुवक काल शनिवारी मोपेड दुचाकी दुपारी त्या परिसरात सहजच फिरायला गेले असता, त्या ठिकाणी बसून गप्पाटप्पा मारल्यानंतर त्यांना पोहण्याचा मोह आवरला नसल्याने तिघांनी आपले कपडे, चप्पल व मोबाईल दुचाकीवर ठेवून पाण्यात पोहायला उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तीनही युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदय हेलावणाऱ्या घटनेने पुरती ग्रामीण परिसरासह वणी शहरात शोककळा पसरली आहे.
Previous Post Next Post