टॉप बातम्या

विषबाधा होऊन युवा शेतकऱ्याचा मृत्यू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

वणी : वणी तालुक्यातील चिंचोली येथील युवा शेतकऱ्याचा विषबाधा होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

साहिल किशोर भोयर (20) रा चिंचोली असे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. प्राथमिक अहवाला नुसार साहिल भोयर हा दि.28 ऑगस्ट 2023 रोजी स्वतः च्या शेतात फवारणी करित असताना त्याला विषबाधा झाली. पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलविण्यात आले होते, काल शनिवार 2 सप्टेंबर रोजी त्याची प्रकृती गंभीर झाली व तो मृत पावला. या दुःखद घटनेने भोयर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले.

साहिल याच्या पश्चात वडील, आई, भाऊ व आजी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 
Previous Post Next Post