सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
धम्मरत्न सुधाकर भगत (वय 25) रा. तेजापूर असे त्या वीज पडून ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. आज दि. 6 ऑगस्ट ला बुधवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. यावेळी पावसात अडेगाव शिवारातील एका शेतात अचानक वीज पडल्यामुळे जनावरे चराई करत असलेल्या शेतकरी पुत्र धम्मरत्न भगत हा ठार झाला. तर त्याचे सोबत असलेले गजानन कोंडेकर (वय 24) व पुनम मालेकर (वय 23) हे दोघे गंभीर जखमी झाले.
यातील जखमी पैकी एकाने संबंधिताना संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तिघांनाही वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तज्ञांनी धम्मरत्न सुधाकर भगत यांना तपासून मृत घोषित केले व इतर दोघांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात भरती केले.