Top News

SDPO गणेश किंद्रे यांची मुंबई येथे बदली तर, सुरेश दळवे हे वणीचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आज (ता.31) गृह विभागाकडून महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी निवडणूकीच्या तोंडावर 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यात सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उप अधीक्षक (नि:शस्त्र) यांच्या सर्वसाधारण बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात खांदे पलट करण्यात आली आहे. 

यामध्ये वणी उपविभागातील गणेश रामचंद्र किंद्रे (उपविभागीय पोलीस अधिकारी), यांच्या बदलीचे आदेश धडकले आहे. त्यांची पोलीस उप अधीक्षक, फोर्स वन मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सुरेश दळवे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली यांची वणी येथील नवे SDPO म्हणून वणी उपविभागाचे असणार आहे.

या फेरबदलांमुळे पोलीस दलातील विविध विभागांना नव्या अधिकाऱ्यांचे नेतृत्व मिळणार आहे. गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, अंमली पदार्थांवरील कारवाई, आणि सायबर गुन्हे यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याने, आगामी काळात शहराची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती चा GR खालील link क्लीक करून पहाhttps://www.mahapolice.gov.in/uploads/general_transfers/d8ac80ba5da33acc7af50879ded702cb.pdf

Previous Post Next Post