Top News

दीपक चौपाटी ते आय टी आय रस्त्याची दयनीय अवस्था, प्रहारचे निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहराच्या दक्षिण भागातील आय टी आय ते दीपक चौपाटी रस्त्याची दुरावस्था झाली असून, रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले असून,याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष केले असून,यावर विभागाने तत्काळ दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष मुबीन पिरसाहाब शेख यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक गावांना दळणवळण व जोडला जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने यावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. ह्याच मार्गांवर श्री रंगनाथ स्वामी मंदीर आहे, आठवडी बाजार भरतो असे असताना या रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते त्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.असं दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष घालून यॊग्य ती कारवाई करावी व रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मुबीन शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.


Previous Post Next Post