गळफास लावून इसमाची आत्महत्या, चोपण येथील घटना


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील चोपण येथील एका इसमाने स्वघृही गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली. सदर घटना आज सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान घडली असा कयास आहे. ते सालगडी म्हणून काम लारायचे अशी माहिती आहे.

अनंता रामचंद्र गाऊत्रे (अंदाजे वय 54) रा. चोपण असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. अनंता याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे.

त्यांचा मृतदेह श्वविच्छेदनसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला.