Showing posts with label राजूर कॉलरी. Show all posts
Showing posts with label राजूर कॉलरी. Show all posts

वासनेने पिसाळलेल्या भासऱ्याने भावसुनेवर केला सतत अत्याचार

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१० ऑक्टो.) : वणी तालुक्यातील राजूर (कॉ) येथील विवाहित महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या महिलेच्या नात्यातीलच व्यक्तीला महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. पतीच्या गैर हजेरीत आरोपीने तिच्या घरी जाऊन तिला धमकावुन जबरदस्ती तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर आरोपी हा महिलेचा पती घरी नसतांना सतत तिच्या घरी जाऊन तिच्यावर बळजबरी करू लागला. असे या पिडीत महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीवर लैगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 

पिडीत महिला व तिचे शारिरीक शोषण करणारा आरोपी राजुर (कॉ) येथे एकमेकांच्या घराशेजारीच राहतात. आरोपी हा नत्यात महिलेचा भासरा लगतो. लहान भाऊ घरी नसतांना तो दारू पिऊन त्याच्या घरी जायचा व एकटी राहणाऱ्या भावसुनेला धमकावायचा. 29 नोव्हेंबर 2020 ला लहान भाऊ घरी नसल्याची संधी साधून त्याने घरी एकटी असलेल्या भावसुनेवर अतिप्रसंग केला. याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यांतर आरोपी हा लहान भाऊ घरी नसतांना नेहमी दारू पिऊन त्याच्या घरी जायचा व पिडीतेला धमकावुन, मारहाण करुन तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबध प्रस्थापीत करायचा. जवळपास एक वर्षापासून तो शारिरीक शोषण करित असल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे. 7 ऑक्टोबर 2021 ला आरोपीने पिडीतेला जबर मारहाण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचर केला. वारंवारच्या जबरी अत्याचाराने त्रस्त झालेल्या महिलेने अखेर हवसेने पिसाळलेल्या आपल्या भासऱ्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ आरोपी राजेंद्र बाबूलाल केवट (40) याला अटक करून त्याच्या विरुध्द भादंवी च्या कलम 376(2)N, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपिआय शिवाजी टिपूर्णे करित आहे.

शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज उचलने म्हणजे भगतसिंग यांच्या विचारांशी जवळीक होय


सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (२८ सप्टें.) : "भारत व पाकिस्तानात शहीद ए आजम भगतसिंग यांना ओळखत नाही असा व्यक्ती क्वचितच सापडणे होय, परंतु त्यांच्या विचारांना समजून घेणे व त्यांच्या विचारावर कृती करणारा मात्र बोटावर मोजण्या इतपत मिळतील. अन्याय अत्याचाराचे विरोधात आवाज उचलणे व अत्याचार होणारच नाही अशी व्यवस्था आणण्यासाठी तसे प्रयत्न करणे ह्यामध्ये फरक आहे, असे असले तरीही शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज बुलंद करून त्यासाठी लढा उभारणे हे शहीद भगतसिंग यांच्या विचाराशी जवळीकता होय", असे मत आज भगतसिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी झालेल्या येथील कार्यक्रमात वक्त्यांनी व्यक्त केलेल्या विचारातून सूर प्रकटला.

येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांच्या प्रतिमेला येथील जिजाई कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक जयंत कोयरे व सामाजिक कार्यकर्ते अश्फाक अली यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

यावेळेस महेश लिपटे सर, पोलीस पाटील सरोज मून, माकपचे कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, कवी-गायक राजेंद्र पुडके, राजूर विकास संघर्ष समितीचे साजिद खान, जयंत कोयरे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मो. असलम, समीर बेग उपस्थित होते. कार्यक्रमात प्रामुख्याने निलेश भगत, जब्बार, स्वप्नील डवरे, प्रकाश दाते हजर होते.