टॉप बातम्या

वणी तालुक्यात दोन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावरच दोघांनी जगाचा निरोप घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

राजकुमार मारोती गोवारदीपे (55) रा. सैदाबाद,येथील शेतकऱ्याने घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना पंधरा ऑगस्टला सकाळी आठ वाजता उघडकीस आली. राजकुमारने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ राजकुमार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतक राजकुमारच्या पाठीमागे मुलगा, स्नुषा व नातवंड असा बराच परिवार आहे.

तसेच तालुक्यातील दुसरी घटना कळमना येथे घडली. येथील सहदेव विश्वनाथ बोबडे यांनीही स्वगृही विषारी द्रव्य प्राशन केले. ही घटना सकाळी सहा वाजता उघडकीस आली. सहदेव यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच आप्तेष्टांनी त्याला तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र त्याचा उपचारादरम्यान रात्री 9 वाजता त्याची प्राणजोत मालवली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून दोन्ही घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Previous Post Next Post