टॉप बातम्या

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची रेड,लाखों रूपयाचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : दिनांक 16/08/2025 रोजी सायंकाळी 17/30 वा. चे सुमारास ब्राम्हणी फाटा ते निळापुर रोडने एका पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा फोर व्हिलर क्र. (MH34BF2140) ने अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून वेगवेगळ्या विदेशी कंपनीचा दारूचा एकुण 82,980 /- रूपयाचा मुद्देमाल आणि इर्टिगा फोर व्हिलर क. MH34BF2140 किंमत अंदाजे 6,00,000/- रूपये असा एकुण 6,82,980/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आरोपी नामे प्रविण शंकरराव मुन, वय 50 वर्ष, आणि विठ्ठल वासूदेव पोलशेट्टीवार, वय 60 वर्ष, दोन्ही रा. घुग्गुस जि.चंद्रपूर यांचेवर कलम 65 (अ) (ई) महाराष्ट्र. दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दळवे साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे आदेशाने पोउपनि धिरज गुल्हाने व डि.बी. पथक यांनी केली.


हा विडिओ जाहिरात तुमच्या फायद्यासाची असू शकते...
Previous Post Next Post