सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी जामणी : 9 ऑगस्ट, जागतिक आदिवासी अस्मिता दिन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा माथार्जुन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील प्रथम नागरिक सरपंच रवींद्र कायतवार, प्रमुख पाहुणे माजी सरपंच तथा सदस्य बाबुलाल किनाके, योगेश मडावी, तंटामुक्ती अध्यक्ष नागोराव दडांजे एसएससी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव मडावी, आशा सेविका माया मरसकोल्हे, अनिता मडावी माजी सदस्य राधा किनाके, राम किनाके, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश मोरे, व सर्व शिक्षक वृंद जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना सरपंच रवींद्र कायतवर, मुख्याधपक अविनाश मोरे, व योगेश मडावी सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळेस जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैली जीवन विषय व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितते विषयी योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक संकल्पना घेण्याची त्यांच्या मनामध्ये चेतना निर्माण केली. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी एकच संकल्पना घेतली पाहिजे की मी भविष्यामध्ये आयएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनीयर होण्याचे ध्येय ठरवले पाहिजे म्हणत त्यांनी या दोन सुत्री कार्यक्रमाच्या निमित्याने सांगितले. सोबतच रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. या औचित्याने विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंदांना जागतिक आदिवासी दिनाच्या व रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.