टॉप बातम्या

मनसैनिक उडानपुलाच्या पिलर वर चढले!

 
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील मनसेच्या वतीने चिखलगाव रेल्वे गेट आणि रेल्वे सायडिंग जवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या संथ कामामुळे त्रस्त झाल्याने मनसे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात महारेल प्रशासनाविरोधात अभिनव आंदोलन करण्यात आले. 

मनसैनिक उडानपुलाच्या पिलर वर चढले, शिवाय येथील रस्ता देखील रोखून धरला. दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या उडानपुलाच्या कामामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी, चिखल, धुळीचे साम्राज्य आणि सततचे अपघात घडत आहे. कंत्राटदाराने सर्व्हिस रोडचे काम देखील पूर्ण न केल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. वारंवार निवेदन देऊनही हा बेजबाबदारपणा सुरु असल्याने वणीकरांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाऱ्यांना मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा राजु उंबरकर यांनी दिला. 

यादरम्यान आंदोलनामुळे तीन तास वाहतूक ठप्प पडल्याने पोलिसांनी मध्यस्ती करीत कंत्राटदार कंपनी आणि मनसे नेत्यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुक्यातील असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 


Previous Post Next Post