बंद खाणीत आढळले अज्ञात तरुण महिलेचे प्रेत


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मोहदा खाण परिसरात आज मंगळवार ला सकाळी एका बंद पडलेल्या खाणीत एका अज्ञात तरुणीचे प्रेत आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वणी तालुक्यातील मोहदा येथील बंद पडलेल्या खाणीत एका अज्ञात महिलेचे प्रेत आज सकाळ सात वाजता च्या सुमारास आढळून आले. ही बाब निदर्शनास येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तोबा घटनेच्या ठिकाणी गर्दी जमली होती. घटनेची माहिती शिरपूर पोलीस स्टेशन ला देण्यात आली, घटनेचे गंभीर बाब लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. 

सदर मृतक माहिलेचा मृतदेह खाणीतून पोलीस व गावातील नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला असून मृतकाची ओळख पाठवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 
Previous Post Next Post