Top News

वणी पोलीस स्टेशन रेेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार साहील पूरी झाला तडीपार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला हद्दपार करण्याची कारवाई केली असून या तडीपारीच्या कारवाईमुळे त्या सराईत गुन्हेगाराला वणी परिसरामध्ये सहा महिन्याकरिता प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार वणी पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा रेकॉर्डवरील मालमत्तेच गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार साहील कैलाश पूरी, (वय २०) रा. सेवानगर, वणी याला याचेवर पो.स्टे. अभिलेखावर चोरी, जबरी चोरी तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न असे बरेच गुन्हे नोंद असून, त्याचे वर्तनामध्ये कोणताही सूधार होत नसल्याने व दिवसेंदिवस त्याची गुन्हे करण्याची प्रवृत्तीत वाढ होत असल्याने, त्यास मा. उपविभागीय अधिकारी वणी, जि. यवतमाळ यांचा आदेश क्रमांक फौजदारी प्रकरण कं. ०२/२०२५ मौजा वणी, ता. वणी जि. यवतमाळ, कलम ५६ (१), (अ), (ब) महाराष्ट पोलीस अधिनियम, दिनांक २३/०६/२०२५ अन्वये सहा महीण्या करीता तडीपार आदेश पारीत झाला होता. तडीपारीत इसम यास यवतमाळ जिल्हा तसेच वणी तालूक्यास लागून असलेल्या इतर जिल्हयातील लगतचे तालूके वरोरा, भद्रावती, कोरपणा तालूक्याचे हद्दीचे बाहेर जाण्याबाबत आदेश पारीत झाले होते.

त्याप्रमाणे तडीपारीत इसम साहील कैलाश पूरी यास दिनांक ०१/०७/२०२५ रोजी सदर आदेशाची एक प्रत तामील करण्यात येवून, तडीपारीत इसमास त्याचे नातेवाईकांकडे पोलीस स्टेशन उमरेड, जि. नागपूर हद्दीत सोडण्यात आले.

सदर ची कार्यवाही गणेश किंद्रे उपभिागीय पोलीस वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक वणी, पो.उप नि. धिरज गूल्हने, पो.कॉ. मोनेश्वर, पो.कॉ. वसीम, पो.कॉ. कुडमेथे, पो.कॉ. मेश्राम, पो.कॉ. नंदकुमार यांनी पार पाडली.


Previous Post Next Post