रस्त्यासाठी लाखापूर ग्रामस्थांचे श्रमदान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लाखापूर गावातील रस्ते, तसेच लाखापूरहून देवी फाट्या कडे जाणारा रस्ता आणि रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे, या रस्त्यांवरून गावाकऱ्यांना आणि पायदळ चालणेदेखील शक्य होत नसल्याने अखेर गावातील तरुण आणि नवं युवकांनी आज बुधवार (ता.6) ला पूर्ण दिवस आपला मजुरी शेतातील काम बंद ठेऊन रस्त्यावर उतरून श्रमदानातून हे रस्ते चालण्यायोग्य तयार केले.

संबंधित विभाग व गट ग्रामपंचायतकडून या रस्त्यांची कामे दुर्लक्षित असून, ही कामे करण्यात यावी अशी मौखिक मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत असून यामध्ये फक्त दुर्लक्षितपणा दिसून येत आहे. लाखापूर वरुन बाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले काटेरी झाडे रस्त्यावर डोलत होती, यामुळे या पावसाळ्यात प्रवास करताना तसेच गावातील रस्ते पाणी रस्त्यावरून वाहून न जाता रस्त्यावरून साचत होते. यामुळे या रस्त्यांना चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, गावातील रस्त्यांची दैना झाली आहे. या रस्त्यावर सर्व दगड गोटे वर आले असून, रस्त्यावरून नागरिकांना भांदेवाडा तिर्थक्षेत्र व पायदळदेखील चालणे फारच कठीण झाले आहे. यामुळे या मार्गांवर अपघात होण्याची शक्यता बळावली जात होती. किंबहुना किरकोळ अपघात झाल्याचे येथील नागरिकांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलताना सांगितले आहे.

या संदर्भात येथील स्थानिक जेष्ठ नागरिक तथा युवकांनी झोपलेल्या स्थानिक प्रशासनाला तसेच संबंधित विभागाला जागे करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून गावातील रस्ते व लाखापूर ते वनोजा देवी मार्ग झूडूपाने वेढले होते त्याला येथील तरुणांनी बुधवारला सकाळी आठ वाजेपासून दुपार पर्यंत येथील रस्त्यावर मुरूम, माती व फवारणीचे काम श्रमदानातून पूर्ण केले. दरम्यान,पावसाच्या रिपरिप मुळे पूर्ण दिवस भर काम होऊ शकले नाही, त्यामुळे श्रमदानातून होणारे काम बंद ठेवावे लागले असे अशी माहिती नागरिकांनी दिली. सदर रस्त्यावरील कचऱ्यावर फवारणी, दगड गोटे खड्डे त्यावर माती, मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत, चालण्याजोगा करण्यात आला. यात गावातील असंख्य तरुणांनी सहभाग घेतला होता.