वणी: संस्कार भारती समिती च्या वतीने गुरुपजन कार्यक्रम संपन्न

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : येथील संस्कार भारती समिती वणीच्या वतीने गुरुपूजन कार्यक्रम करण्यात आला. यावर्षी समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी कलावंताचा घरी जाऊन त्यांचा सन्मान करून पूजन केले. ही समिती कलेची असल्याने नाट्य कलावंत सैय्यद इब्राहिम यांनी 1960 ते 1970 च्या दशकात नौकरी सांभाळून 100 च्या वर नाटकात काम केले. त्यामुळे समितीने त्यांचा सन्मान करून कलेची पूजा केली. 
तसेच घोंसा येथे शिक्षक म्हणून निवृत्त झालेले लक्ष्मण राजगडकर यांनी संगीत शिक्षण घेतल्याने वणी शहरात संगीत शिकवण्याचे कार्य हाती घेऊन अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण उत्तमरित्या दिले. त्यांच्या या संगीत योगदानाबद्दल त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे समितीच्या माजी अध्यक्षा रजनी पोयाम त्यांचे गुरुवर्य गजानन कासावार यांचे त्यांनी सपत्नीक गुरुपूजन केले. यावेळी प्रविण सातपुते, सागर मुने, कविता चटकी, वनिता काकडे, स्मिता नांदेकर, छाया आसुटकर, तेजश्री कापसे, संगीता खाडे उपस्थिती होत्या.
 
          जाहिरात साठी संपर्क : 9011152179