वरोरा: जी एम आर तर्फे पूर ग्रस्तांना मदतीचा हात

कालू रामपूरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : जुलै महिन्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही संततधार पावसाची सुरुच आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहे. त्यातच धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
वरोरा तालुक्यात सुद्धा अनेक गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहेत. या मध्ये तालुक्यातील काही गाव पाण्याने पूर्णतः वेढली गेली. गावाकऱ्यांचे घरदार पाण्यामध्ये गेल्याने अंगावरील कपड्यावरच अन्य ठिकाणी आसरा शोधावा लागला. जिल्हा प्रशासन तसेच स्थानिय लोकप्रतिनिधी, तालुक्यातील प्रशासन पूर ग्रस्तांच्या मदतीला धावून आलेले आहे यातच वरोरा तालुक्यातील विद्युत निर्मिती प्रकल्प जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड (GMR WARORA ENERGY LIMITED) नेहमीच आपले सामाजिक दायित्व जोपासात या पूर ग्रस्तांच्या मदतीसाठी आपला सहकार्याचा हात पुढे केलेला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी मा प्रतिभा धानोरकर यांच्या आवाहनाना प्रतिसाद देवून पूर ग्रस्ताना धान्याची पाकीटे जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड द्वारे त्याच्या जी एम आर वरलक्ष्मी फाउंडेशन तर्फे माननीय आमदार यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली. स्थानिक प्रशासन द्वारे गरजू व्यक्तींना वितरित हे धान्याची किट करण्यात येईल असे मा आमदार यांनी सांगितले. या वेळीस त्यांनी जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड व जी एम आर वरलक्ष्मी फाउंडेशन च्या संचालक व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
वेळोवेळी केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिल्यामुळे व आपल्या सामाजिक दाजीत्वाचे निर्वाहन काटेकोरपणे करणाऱ्या जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड चे प्लांट हेड श्री धनंजय देशपांडे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी श्री विनोद पुसदकर, हेड कॉर्पोरेट अफेअर्स व अकबर अली कंपनीचे पदाधिकारी उपस्थिती होते.