पूर ग्रस्ताच्या मदतीला सरसावले केराम गुरुजी!

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 
   
मारेगाव : तालुक्यात पूर परिस्थिती भयावह आहे. सतत संततधार सुरुच असून त्याचा जोरदार फटका शेतकऱ्यांना बसला, त्यामुळे शासनाची तात्काळ मदत मिळावी म्हणून विविध स्तरावरून
यासाठी प्रशासन दरबारी निवेदने देवून ओला दुष्काळ व नुकसान भरपाईची मागणी केली जात असतांना जळका येथील जिल्हा परिषदेचे गुरुजी पूर ग्रस्ताच्या मादीतीला सरसावले.
मारेगाव तालुक्यातील जळका येथील जिल्हा परिषद शिक्षक केराम यांनी पूर ग्रस्तांना आपल्या पगारातून 20 हजार रुपये कपात करण्यासाठी गट शिक्षण अधिकारी यांना लेखी पत्र दिले. संकटकाळी मदत करतांना राजकीय पुढारी सरसावतांना अनेकदा दृष्टहीपथात आले. त्यातच सर्वसमावेशक कर्मचारी यापासून सुरक्षित अंतर ठेवतांनाचे अनुभव टाळता न येणारे आहे. मात्र, याला अपवाद ठरले. मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जळका जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेचे सहा.शिक्षक सुभाष मोतीराम केराम यांनी स्वतः जुलै च्या पगारातून तब्बल विस हजार रुपये कपात करून ते पूरग्रस्तांना देण्याचे पत्र गटशिक्षणाधिकारी यांना दिले.
मारेगाव तालुक्यातील भयाण ठरत असलेल्या पुरस्थितीला शिक्षकाचा असाही आधार पूरक ठरत मायबाप सरकारला तोंडात बोटे घालणारा ठरतो आहे. मागील पंधरा दिवसापासून अस्मानी सुलतानी संकटाने शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रश्न गडद केले आहे. पिके,घरदारांसह जमिनीचे प्रचंड नुकसान झाल्याने तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी विवंचनेत आहे. प्रशासनाने पंचनामेकरिता आदेश निर्गमित केले असले तरी, वास्तवात मदत मिळण्यासाठी किती दिवस लागतील याबाबत सारेच अनभिज्ञ आहे. मदत तोडकी मिळाली तर यातून पिडीत शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल काय? त्यातून सावरेलही काय? हे असे ऐक ना अनेक प्रश्न सर्वांकरिता तूर्तास अनुत्तरीत आहे.    

अलीकडेच महागाईचा भडका सर्वांचे कंबरडे मोडत आहे. आवक पेक्षा गरजा अधिकच्या वाढल्या आहे. मदत करण्यास कुणी पुढे येतांना दिसत नाही. हे वास्तव टाळता न येणारे असले तरी, यास मारेगाव तालुक्यातील जळका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सहा.शिक्षक सुभाष मोतीराम केराम अपवाद ठरते आहे. त्यांनी थेट मुख्याध्यापक मार्फत गटशिक्षणाधिकारी यांना पत्र देत माहे जुलै च्या पगारातून 20 हजार रुपये पूरग्रस्तांसाठी कपात करण्याचे पत्र देत मदतीचा हात पुढे केला आहे.
         
सध्या मारेगाव तालुक्यातील विदारक स्थितीत व संकटात सापडलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत ही आता अनिवार्य आहे. मदतीची भावना गुरुजींनी कृतीत उतरविली असली तरी पुन्हा मदतीचा ओघ कायम ठेवण्यासाठी केराम गुरुजींचा "धडा" कोण कोण गिरविणार हा खरा प्रश्न पिडीत शेतकऱ्यांच्या वेदनेला फुंकर घालणारा ठरावा ह्याच माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.