सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 395 व्या जयंतीनिमीत्य अभिवदन कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्याध्यापक अभय पारखी यांचे अध्यक्षतेखाली अनीता टोंगे, प्रतिश लखमापुरे, सुनिल गेडाम यांनी महाराजांचे जिवनावर विचार व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री.पारखी सरांनी मार्गदर्शन करुन जयंतीनिमीत्य सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन हरीष वासेकर यांनी तर,आभार प्रदर्शन हरीष बोढाले यांनी मानले. यशस्वितेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक प्रयत्न केले.