सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पोलीस स्टेशनच्या वतीने अवैध धंद्यावर कारवाई करीत 1 लाख 6 हजार रुपयांचा वर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने तालुक्यातील तस्करात धडकी भरली आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर जिल्हा अधिक्षक पियूष जगताप यांच्या आदेशाने वणी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात वणी ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या नेतृत्त्वात पोउपनी शेखर वांढरे, सुरेंद्र टोंगे, पोहेका, मारोती पाटील, पोहेका दीपक मडकाम, पोका शाम राठोड, पोका विजय गुजर, पोका महेश बाडलवार, पोका प्रफुल नाईक, जया रोगे, चैताली यांनी पार पाडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजी पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, प्रभाग क्र. 3, सिंदी कॉलनी येथील एका घरात लपून-छपून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक केली आहे. सदर माहितीची शहानिशा करुन सीमा राम सुरकर अन्न सुरक्षा अधिकारी व औषध प्रशासन यवतमाळ यांना माहिती देऊन यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी मंगळवारी सकाळी 8 वाजता घरामध्ये मजा 108 कंपनीचा 1 लाख 6 हजार 510 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसायासाठी साठवणूक करणाऱ्या रोहित सुभाष तारुणा (वय 28, राहणार सिंधी कॉलनी, वणी) या आरोपीवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व 2011 चे कलम 26 (1), 26 (2) (lv) 27 (3) (e), 30 (2) (a), कलम 3(1) (zz) (iv) व 59 तसेच बीएनएसच्या कलम 123 274, 275, 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहीत तारुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.