टॉप बातम्या

पोलीस वार्ता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी पदी नरेश ठाकरे यांची नियुक्ती


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : पोलीस वार्ता न्यूज मराठीच्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून नरेश ठाकरे यांची निवड करण्यात आली. ही नियुक्ती संपादक निलेश फिरके यांनी केली. 

समाजात होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात पोलीस वार्ता च्या माध्यमातून निर्भीड निष्पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे नरेश ठाकरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आज दि. 18 फेब्रुवारी ला मानवी हक्क सुरक्षा परिषद मारेगाव ता. अध्यक्ष तथा सह्याद्री चौफेर चे संपादक अमोल कुमरे यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी श्री राजीव सोनकुसरे (फायनान्शिअल ॲडव्हायझर) व मित्र परिवार उपस्थित होते. उपसंपादक राज निकाळे यांनी ठाकरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post