निंबाळा येथे बचत गटातर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : बचत गटातील महीला सखीं द्वारे निंबाळा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विवीध कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटनास्थळी उपस्थित राहून महिलांनी शिक्षण व समानतेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची महती सांगितली. 
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आणि त्यांच्या योगदानाची आठवण सांगणारे भाषणे झाले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजातील महीलांवीषयीचे भेदभाव,अंधश्रद्धा,अनिष्ट चालीरीती,प्रथा-परंपरा नष्ट करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याला समर्पित असलेला हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला. 

कार्यक्रमाच्या उद्घाटनावर उपस्थित असलेल्यांनी महिला सशक्तीकरण व शिक्षणाच्या महत्वावर भर दिला आणि महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी एकजुट होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय सौ.किरण देरकर अध्यक्ष सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन, सौ.वृषाली खानझोडे मा.ऊपसभापती पं.समीती, सौ.पौर्णीमा भोंगळे मा.सरपंच लाठी, सो.सुनिता ढेंगळे सरपंच निंबाळा, सौ.संगीता डाहुले मा.वी.म गटप्रमुख, सौ.आसेकर ताई, सौ.मीलमीले ताई,सौ.बोरडे ताई, सौ.प्रणाली कुत्तरमारे, अंगणवाडी सेवीका-सौ.सुरेखा ताई व बचतगटातील सर्व सन्माननीय महीलासखी उपस्थित होत्या.