खैरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : खैरी येथील ग्रामपंचायत कार्यालयातमध्ये गावातील यशवंत विद्यालय, लोक विद्यालय, जि.प.उच्च प्राथमिक शाळा, जि.प.प्राथमीक मुलींची शाळा, आरोग्य विभाग, महसूल विभाग, तसेचअंगणवाडी चारही केंद्र, कानव्हेट, मधील विद्यार्थ्यांची गावातील प्रमुख मार्गानी प्रभातफेरी काढुन मोठ्या बजरंगबली चौकातील ध्वजारोहण प्रमोद बोडे सदस्य ग्रा.पं खैरी यांच्या हस्ते करण्यात आले. 

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण हे खैरी ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच श्रीकांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा.पं सर्व सदस्य, तसेच सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्त ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले आहे.