सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आज 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कानडा ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. सुषमा रूपेश ढोके यांच्या संकल्पनेतून महिला आरोग्य विषयक जनजागृती व सॅनिटरी नेपकिन वाटप करण्यात आले. भारतीय शिक्षणाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात ग्रामीण भागातील महिला अनेक आजार अंगावर काढतात व काही आजारांबाबत अजूनही महिला अनभिज्ञ् असल्यामुळे आता कमी असणारे आजार दिवसेंदिवस वाढतच जातात आणि आजार जास्त झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जातात. वेळप्रसंगी अनेक महिलांना प्राण सुद्धा गमवावे लागतात, या सर्व गोष्टींची जाणीव लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीची महिला नात्याने त्याची जान असलेल्या संरपचा सुषमा ढोके यांचे अध्यक्षतेखाली हा लोकहितार्थ उपक्रम राबविला.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या श्रृती गलाट आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले, आशा सेविका वंदना ढोके, ग्राम. सदस्य कविता झीले, ग्राम. सदस्या रेखा आस्कर, संगीता येवले, अंगणवाडी सेविका गिता चवले, मेघा ढवस पोलिस पाटील, सुवर्णा येवले, श्रद्धा डाहूले, पुष्पा ढोके व गावातील महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आभार वंदना ढोके आशा वर्कर कानडा यांनी मानले.