अर्धनग्न आंदोलनाचा धसका : नगरपंचायत प्रशासनाने घेतली अखेर दखल

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील धार्मिक प्रार्थनास्थळांच्या परिसरात दारू विक्री व्यवसाय सुरू करण्याचा घाट करित असल्याच्या दारू दुकानांविरोधात नागरिकांतून असंतोष वाढला. नागरिकांनी या दारू दुकानाविरोधात आवाज उठवणे सुरू केले, स्थानिकांनी यासाठी संबंधितांना निवेदने दिलीत तर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मात्र, हे "अर्धनग्न आंदोलन" लक्षवेधी ठरत प्रशासनाने तात्काळ या आंदोलनास भेट देत असा कोणताही परवाना देण्यात येणार नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन देत सांगितले.

बेरोजगारीने कळस गाठलेल्या मारेगाव शहरात जवळपास दहा ते अकरा बिअर बार आहेत. चार देशीची दुकाने आहे. तर दोन बिअर शॉप, ही सर्व आपापल्या ठिकाणी असून, कुठलीही हालचाली न करता गुण्यागोविंदाणे आहे त्याच ठिकाणी नांदत आहे. परंतु चार पैकी एका देशी दारू दुकानाचे अगदी महामार्गवरील जागेवर स्थलांतरित करण्याचा बेत आखत परवानगी मिळवण्यासाठी कागदोपत्री हालचाली करण्याचा डाव सुरु असल्याचे स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच निवेदन सह सोमवार दि.17 जुलै रोजी प्रस्तावित दारू दुकानाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करित अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकाळी ९ ते सायं.६ वाजेपर्यंत चालू होते. या आंदोलनात विलास रायपुरे, गजानन चंदनखेडे, चांद बहादे, अनिल गेडाम (नगरसेवक), ज्ञानेश्वर धोपटे, आकाश भेले, गौरव कोवे, यांनी उठाव करित प्रस्तावित दारू दुकानाचा तीव्र विरोध केला. नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीसह आंदोलनाची दखल घेऊन, नियोजित व्यवसायास कोणतेही सहकार्य न करण्याचे अभिवचन यावेळी देण्यात आले.

आंदोलनास भेट दिलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील धार्मिक स्थळाला भेट दिली. व नियोजित व्यवसायाबाबत खेद व्यक्त केला. ठाणेदार जनार्धन खंडेराव, प्रभारी मुख्याधिकारी अरुण भगत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी वानखेडे, किशोर यादव यांचे सह शहरातील शेकडो नागरिकांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली.