सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : स्थानिक विवेकानंद विद्यालयात किशोरवयीन मुलींना शुक्रवार दि.२४/०२/२०२३ ला मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय स्त्री शक्ती नागपूरच्या उपाध्यक्षा सौ. राधिका देशपांडे व कार्यकारिणी महिला उपस्थित होत्या.प्रमुख पाहुण्या सौ. सुनिता विदयवंश, सौ. वर्षा देशपांडे, सौ.श्रद्धा श्रोत्री, सौ. भारतीताई सरपटवार,सौ.देशमुखताई व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आस्कर सर,विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वंदनाताई वऱ्हाटे व्यासपिठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात सौ.राधिका देशपांडे यांनी किशोवयीन मुलींना या वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदल तसेच मासिकपाळीच्या वेळी मुलींना होणाऱ्या समस्या व उपाय यावर मुलींना बोलते केले.