सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : रासा येथील शेतकरी नरेश कवडू घुगुल यांच्या स्वत:च्या मालकीची बैलजोडी अंदाजे किंमत एक लाख रुपयांची बैलजोडी चोरट्यांनी लांबवली आहे.
नरेश घुगुल यांनी दिलेल्या माहितीनुसार आमची लाख्या रंगाची बैलजोडी गोठ्या समोर बांधलेली होती, संशयित आरोपींनी चोरून नेली, व ती बैलजोडी कत्तलीसाठी जनावर पुरविणाऱ्यांच्या हाती दिली. असा त्यांचा आरोप असून नरेश घुगुल यांना माहिती होते की, आपली बैलजोडी कुणी चोरली व संशयित आरोपी कोण? हे पण त्यांना माहिती होते. ही सर्व माहीती घेऊन ते वणी पोलिसांकडे गेले, पण या प्रकरणाचा धातूरमातुर तपास वणी पोलिसांनी केला आहे. असा त्यांचा थेट आरोप आहे.
शेतकऱ्याचा मित्र बैलअसून त्याची बैलजोडी चोरून नेली असून, शेतकरी चिंतेत आला आहे. पुलिस प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करत असून १४ फेब्रु. ला घुगुल यांची बैल जोडी चोरून नेली, यासंदर्भात रीतसर तक्रार वणी पोलिसात दिली आहे, मात्र कुठलाही तपास पोलीस यंत्रणेकडून होत नसल्याची खंत शेतकरी घुगुल यांनी व्यक्त केली.
तूर्तास शेतकरी घुगुल यांचा गावातील दोघांवर संशय आहे. त्यांनी त्यांची नावासहित तक्रार दिली असून सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही, हे सर्व सांगताना घुगुल म्हणाले की, ज्या दिवसापासून माझी बैलजोडी चोरीला गेली तेव्हा पासून त्यांना माहिती झाले की, आरोपी कोण?, आरोपीने ते बैलजोडी कुणाला दिली! व ती बैलजोडी कुठे गेली ही सर्व माहिती पोलीस प्रशासनाला तक्रारीस्वरूपात दिली असून सुद्धा माझ्या तक्रारीकडे जाणीव पूर्वक अधिकारी दुर्लक्ष करित आहे. असा थेट आरोप नरेश कवडू घुगुल यांनी पोलीस प्रशासनावर लागवला.
नरेश घुगुल या शेतकऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे साकडेअजूनही वणी पोलिसांकडून बैलाचा शोध घेण्यात आला नाही. अखेर हतबल शेतकऱ्यांने वणी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत तक्रारीचे निवेदन देवून त्याच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, वणी विधानसभा क्षेत्र आमदार, गृहमंत्री महाराष्ट्र शासन व पालकमंत्री यवतमाळ यांना दिले आहे