सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : पन्नास वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक परंपरेतील महामूर्ख संमेलन रंगपंचमीला पार पडले या संमेलनात वणीकर मनमूराद हसले.सलग चार तास दिग्दज कलावंतांनी विविध हास्यरंगाची पेरणी केली.
शेतकरी मंदिर वणी येथे पार पडलेल्या महामूर्ख संमेलनात वणीचे नाट्य व हास्य कलावंत प्राचार्य हेमंत चौधरी व वराडी कवी पुरूषोत्तम गावंडे यांच्या बतावणी या आगळ्यावेगळ्या लोककलेला बघून प्रेक्षक पोट धरून हसले पुणे येथील सुप्रसिध्द कवी अनिल दिक्षित यांच्या झिंगाट कवितेने संमेलनात आणखीनच रंगत आणली संमेलनाच्या उतर्राधात नागपुरचे मिमिक्री स्टार एजाज खान यांनी हास्याचे फवारे उडविले.या सर्व कलावंतांच्या सादरीकरणामूळे महामूर्ख संमेलन आगळेवेगळे ठरले.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मून्नालाल तुगनायक, शशिकांत मालिचकर, जयचंद्र खेरा, संजय खाडे, राजेश महाकुलकार,भुमारेड्डी बोदकुरवार, गजानन बोढे,विलन बोदाडकर, सुनील पानघाटे व वसंत जिनिंग वणीचे अध्यक्ष श्री आशीष भाऊ खुळसंगे यांचे विशेष सहकार्य लाभले.