सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
बीड : विविध पेपर मध्ये काम करणाऱ्या आणि सर्वांच्या परिचयाच्या असणाऱ्या ऋतुजा किशोर सोनवणे या गेल्या २३ फेब्रुवारी पासुन बेपत्ता असून अद्याप ऋतुजा किशोर सोनवणे यांचा शोध लागलेला नाही.
पत्रकार ऋतुजा किशोर सोनवणे यांचा शोध त्यांचे पती किशोर सोनवणे यांनी सर्व नातेवाईक व जवळच्या सर्व लोकांना संपर्क साधून भेटून विचारपूस केली. परंतु त्यांचा कुठेही शोध लागला नसल्याने अखेर त्या बेपत्ता असल्याची फिर्याद पेठ, बीड पोलीस ठाण्यात देण्यात आलेली असुन, पंधरा दिवस उलटून गेले तरीही त्यांचा शोध काही लागलेला नाही. ऋतुजा किशोर सोनवणे यांचा शोध पेठ बीड पोलीस सह त्यांचा पती किशोर सोनवणे आणि त्यांचा मुलगा प्रेम हे सर्व घेत आहेत.