शिक्षक पुरुषोत्तम गमे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महागांव येथील कार्यरत असलेले मुख्यध्यापक पुरुषोत्तम पी गमे हे नियतवयोमानाने 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सिंधी महागांव च्या वतीने भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा आज 10 मार्च रोजी आयोजित करून जड अंतकरणाने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक गमे हे शिक्षक म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील एका आश्रमशाळा येथे 1988 ला शासकीय सेवेत रुजू झाले. यानंतर 1992 रोजी जिल्हा परिषद मध्ये त्यांची नेमणूक झाली. 

शिक्षक म्हणून तब्बल 32 वर्ष शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करुन नुकतेच 28 फेब्रुवारी 2023 रोजी सेवा निवृत्त झाले आहेत. दरम्यान,सेवाकाळातील अधिकांश काळ हा महागांव शाळेत घालवल्यामुळे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापनच्या वतीने भव्य सन्मान सोहळा आयोजित करून जड अंत: करणाने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, पं स मारेगाव, प्रमुख अतिथी नरेंद्र कांडूलवार गट शिक्षणाधिकारी पं स मारेगाव तर विशेष अतिथी निलिमा थेरे सरपंच, अविनाश लांबट उपसरपंच तथा तालुका अध्यक्ष अ.भा.स. सं.मारेगाव, गजानन लांबट अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम सदस्य तथा माजी सरपंच, देविदासजी लांबट, माजी पोलीस पाटील, संगीता वाघाडे ग्राम. सदस्य, विमल आत्राम ग्रा. पं. सदस्य, जोती वाकडकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सुरेश लांडे,आदी उपस्थित होते. 

गमे हे अतिशय शांत, संयमी, मितभाषी स्वभावाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक व शेवटी कर्तव्य कठोर मुख्याध्यापक म्हणुन परिचित होते. त्यांच्या सेवा काळात अनेक विद्यार्थ्याना घडवण्याचे मोठे काम त्यांच्याकडून करण्यात आले. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन मिलमिले यांनी केले तर, सुरेख सुत्रसंचलन खोब्रागडे सर यांनी केले शेवटी आभार राजू व्यवहारे यांनी मानले.