सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : जिल्ह्यातील पाहिले 1857 च्यां लढ्यातील पाहिले शहिद वीर बाबुराव शेडमाके ह्यांच्या जयंती निमित्याने बिरसा क्रांती दल चंद्रपूर च्यां वतीने विविध कार्यक्रम घेऊन जयती पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.
12 मार्च रविवार रोजी सकाळी 9 ते 12 वीर शहीद बाबुराव शेडमाके ह्यांच्या शहीद भूमी म्हणजेच आजचे जिल्हा करागृह गिरनार चौक चंद्रपूर इथे अभिवादन करून रॅलीचा आरंभ होईल रॅली चे उद्घाटक म्हणून श्री नरेश बाबू पुगलिया माजी खासदार चंद्रपूर ,अध्यक्ष दशरथ जी मडावी बिरसा क्रांती दल ,स्वागताध्यक्ष किशोर भाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर ,विशेष अतिथी हंसराजजी अहिर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा विद्यमान अध्यक्ष मागासवर्गीय आयोग भारत सरकार ,प्रमुख पाहुणे श्री नागेश जी घोडाम, माजी खासदार तेलंगाना ,श्री राजे वीरेंद्रशहा आत्राम गोंड राजे वंशज चंद्रपूर, श्री दीपक दादा आत्राम माजी आमदार अहेरी, मा राजूभाऊ तोडसाम माजी आमदार आर्णी, यांच्या उपस्थितीमध्ये रॅली ची सुरुवात होईल .गांधी चौक मार्गे न्यू इंग्लिश शाळेचे पटांगण शासकीय विश्रामगृह चंद्रपूर इथे पोहचून रॅली चे समापन होईल.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र आदिवासी जनसंवाद परिषद दुपारी 12 ते 6 पर्यंत होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाळू धानोरकर खासदार चंद्रपूर, अध्यक्ष दसरथ जी मडावी बिरसा क्रांती दल, स्वागताअध्यक्ष किशोर भाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर,विशेष अतिथी विजयभाऊ वडेट्टीवार आमदार ब्रह्मपुरी ,मुख्य मार्गदर्शक मा.प्रा. मधुकरजी उईके,केंद्रीय अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन,मा श्री ईंजी.सतीश दादा पेंदाम संस्थापक अध्यक्ष बिरसा ब्रिगेड. मा.श्री राजेंद्र जी मरस्कोल्हे संस्थापक अध्यक्ष ऑफ्रोड संघटना. मुख्य मार्गदर्शक म्हणून विविध संघटनेचे पदाधिकारी एकाच मंचावर येऊन पहिल्यांदाच आदिवासी समाजाला मार्गदर्शन करत असल्याने बरेच समाज बांधव एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तिसऱ्या सत्रात आदिवासी पारंपारिक ढेमसा नृत्य व सांस्कृतिक महोत्सव सायंकाळी सहा वा. उद्घघाटक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष एम. मुरुंगनानथम प्रकल्प अधिकारी चंद्रपूर विशेष अतिथी किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर ,संतोषसिंग रावत अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे पहिले बक्षीस वीस हजार रुपये दुसरे बक्षीस पंधरा हजार रुपये तिसरे बक्षीस दहा हजार रुपये असे देण्याचे नियोजित आहे त्यामुळे विदर्भातून बरेचसे गोंडी नृत्य संच उपस्थित राहील अशी आशा बाळगली जात आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी अल्पोहार, सायंकाळी जेवणनाची व्यवस्था बिरसा क्रांती दल चंद्रपूर मार्फत करण्यात आली आहे. तरी होणाऱ्या पर्वास मोठ्या उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.