कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्दालय, मारेगाव जि. यवतमाळ येथील वनस्पतीशास्त्र विभागाची प्रफुल्ल मशरूम प्रकल्पाला भेट


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अमरावती विद्यापीठानी सत्र 2022-2023 पासून B.Sc भाग 1 च्या विद्यार्थ्या करीता नवीन शिक्षण प्रणाली (सीबीसीएस) सुरू केली आहे. या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांनी उद्दोजक्ता क्षेत्रा कडे जास्त भर द्यावा या करीता भाग 1 च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रकल्प दिले आहे. या मध्ये एक प्रकल्प म्हणजे मशरूम कल्टिवेशन हा प्रकल्प घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार दि. 20/12/22 रोजी प्रफुल्ल मशरूम प्रोजेक्ट, चंद्रपुर या ठिकाणी जाण्याचे ठरविले.

या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मशरूम चे उत्पादन, त्यासाठी घाव्याची काळजी व इतर माहिती सर्व लिहून घेतली. ही सर्व माहिती प्रकल्पाचे मुख्य श्री. प्रफुल्ल शेंडे साहेब यांनी दिली. या भेटीचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ. विनोद चव्हाण यांनी केले तर या भेटीसाठी प्रा. डॉ.सोडणार, प्रा. देशमुख, प्रा. भांदक्कर, प्रा. माकडे व प्रा. डॉ. अडसरे यांनी सहकार्य केले.

तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी भेटीला जाण्यास परवानगी देवून सहकार्य केले. या कार्यक्रमाकरीता श्री. आकाश कुमरे यांचे विशेष सहकार्य लाभले.