गाडेगांव येथील शेतमजुराचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील गाडेगांव येथील जीवनाला कंटाळलेल्या शेतमजुराने विषारी किटकनाशक प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना दि. 24 डिसेंबर रोज शनिवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मारेगाव तालुक्यातील गाडेगांव किसन सोनबा डंबारे (अंदाजे वय 70) असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या शेतमजुराचे नाव आहे. त्याने शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास स्वतःचे घरी किटकनाशक प्राशन केल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी किसनला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकुर्ती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे रवाना करण्याचा सल्ला.
चंद्रपूर येथे उपचारादरम्यान रात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा हे अद्याप स्पष्ट नसून, किसन यांच्या पाठीमागे एक मुलगा, तिन मुली, नातवंड असा बराच मोठा अप्तपरिवार आहे.