नरसाळा येथे शांततेत व उत्साहात पार पडले दुर्गा विसर्जन

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्री दुर्गा महोत्सव साजरा करण्यात आला होता.एक वार्ड एक दुर्गादेवी या प्रमाणे गावात दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली होती.

दररोज प्रत्येक देवी जवळ भजन कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात आले होते. तर काही देवी जवळ विविध उपक्रम घेऊन गावात आनंदमयी वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक देवीचे विसर्जन करतांनी विविधप्रकारचे गोंडी भजन, ढोल -तासे तर काहीने आधुनिक डीजे लावून गावभर मिरवणूक काढून दुर्गा विसर्जन केलेत. पण मात्र, एकवीरा दुर्गाउत्सव मंडळानी दुर्गा विसर्जन करतांनी गावातील महिला व मुलींनी नववारी लुगडे नेसून डीजेच्या गाण्यावर सुंदर डान्स करीत सर्व गावकऱ्याचे लक्ष वेधले होते. त्याला पाहण्यासाठी लहान,मोठ्यांनी गर्दी केली होती. या गर्दीत सर्वात मोठी संख्या महिलांचीच होती.हेच या मंडळाचे आकर्षण दिसून आलेत.

सतत दहा वर्षांपासून हे मंडळ दुर्गाउत्सव साजरा करीत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश नक्षीने यांनी सांगितले.दुर्गाउत्सव साजरा करण्याकरिता मंडळाचे उपाध्यक्ष विशाल कारसर्पे, सचिव प्रथमेश नेहारे, संयोजक वैभव गोवर्धन नारायण खंडरे शिवम कुळमेथे रवींद्र गाथाडे तर येथील पेसा कोष समितीच्या अध्यक्षा उज्वला मडावी,लीला दडाजे,कौशल्या कोरझरे, भारती नेहारे,गीता कुळमेथे,विमल कारसर्पे,कोमल गोवर्धन,यांनी मोलाचे सहकार्य केले.