वणी : समीक्षक संपादक प्रा.डॉ.अजय देशपांडे संपादित
नागरमोथा (सदानंद देशमुख यांच्या निवडक कथा)
या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांचे हस्ते येत्या सोमवारी (१० आक्टोबर) वणी येथे होणार आहे.
वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित
लोकमान्य टिळक महाविद्यालय व नागपूर येथील विजय प्रकाशनाच्या वतीने आयोजित केलेल्या या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा भूषविणार आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या अमरावती विभागाचे सहसंचालक (उच्च शिक्षण) व समीक्षक डॉ. केशव तुपे,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख व समीक्षक डॉ. शैलेंद्र लेंडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड्.लक्ष्मणराव भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के हे प्रमुख अतिथी असतील.सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक अजेय गंपावार करतील.
दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता
लोकमान्य टिळक सभागृहात होणाऱ्या या सोहळ्याला अभ्यासकांसह वाचन प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे व विजय प्रकाशनाचे संचालक सचिन उपाध्याय यांनी केले आहे.