कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : पं स अंतर्गत येत असलेल्या येणक येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपुरुष व राष्ट्रसंताचे फोटो लावण्या संबंधाने ठराव घेऊन तसी खरेदी करण्यात आली आहे; परंतु त्यातील काही फोटो विवादास्पद आहे.
भारतातील स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार व स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली अशा 'सावित्रीबाई फुले यांच्या शेजारी ग्रामपंचायत कार्यालयात एका देवीचा फोटो लावण्यात आला आहे. त्या फोटोत भारताच्या प्रमाणीत नकाशाच्या मधोमध देवीचा चित्र रेखांकित केले आहे. त्यामुळे भारताच्या नकाशाचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. भारताच्या नकाशात अश्या पद्धतीने बदल अथवा नकाशाचे विकृतीकरण करणे एखाद्या देवीला स्थापित करणे म्हणजेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण आहे.
दिनांक 24/09/2002 च्या मासिक बैठकित मुद्दा उपस्थीत करून सुद्धा मा. सरपंच सौ. कल्पना टोंगे यांनी कार्यवाही केली नसुन ग्रामपंचायत सरपंच विशिष्ट देवी-देवतांना प्राधान्य देत असल्याचे यातुन दिसुन येत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेले सर्व फोटो ग्रामपंचायतीच्या निधीतून लावण्यात आलेले आहे. संपूर्ण निधी सामान्य लोकांच्या करातून उत्पन्न होत असल्यामुळे ती संपत्ती शासकिय स्वरुपाची आहे. त्यामुळे शासकिय निधी कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माच्या पंथाच्या उदात्तीकरणासाठी वापरता येत नाही मात्र, मा. सरपंच सौ. कल्पना टोंगे यांनी शासकिय निधीचा गैरवापर केला आहे. असा आरोप अनिल रामश्याम तेलंग येनक ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे.
येनक ग्रामपंचायत कार्यालयातून देवीचा फोटो हटविण्याचा लेखी आदेश काढण्यात यावा. भारताच्या नकाशाचे विद्रुपीकरणासाठी शासकिय निधी वापरल्यामुळे योग्य कार्यवाही करण्यात यावी. खर्च झालेला निधी परत देण्यात यावा. अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य अनिल तेलंग यांनी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्याकडे निवेदनातुन केले आहे.