सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
यवतमाळ, (०२ सप्टें.) : राळेगांव तालुक्यातील ग्राम आष्टा येथे शेतकऱ्याच्या शेतात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ अकोला व्दारा संचालीत केवलरामजी हरडे कृषी महाविदयालय, चामोर्शी जि.गडचिरोली येथील अंतीम वर्षाची विदयार्थीनी कु. कोमल विजय नंघरधने, या विद्यार्थीनी कृषी ग्रामीण उपकमाअंतर्गत प्रशिक्षण घेउन उततमराव विठोबाजी शेंडे याच्या शेतात कामगंध सापळे शेतात लावल्याने काय फायदा होतो या बद्दल मार्गदर्शन केले. कमी खर्चात किडीचे नियंत्रण कसे करता येईल तसेच किडीची संख्या आर्थीक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी कामगंध सापळे याचा वापर फायदेशीर ठरतो याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यावेळी तिने असे सांगीतले की गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तसेच प्रत्येक जातीच्या किटकासाठी हेक्टरी ५ सापळे आवश्यक आहे. शेतीच्या आकारानुसार तसेच पिकाच्या उंचीनुसार साधारणतः एक ते दिड फुट या उचोवर लावावे व २ सापळयामधील अंतर १५ ते २० मिटर ठेवाने तसेच गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी गॉसिपल्यूर, पेंटीनो ल्यूर वापसवे आणि लावलेली ल्यूर दर ३० दिवसानी बदलून व्यावी तसेच त्यामध्ये अडकलेले पतंग प्रत्येक आठवड्यात काढून टाकुन नष्ट करावे, असे शेतकऱ्यास मार्गदर्शन केले.
यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.डी.टो सुरजे तर ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम प्रमुख प्रा.के डी गहाणे, प्रा.आर.जे. चौधरी, तसेच विशेष विषयतज्ञ प्रा.बील दुधवळे यांचे मार्गदर्शन लाभले.