सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (०२ सप्टें.) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय कोंघारा येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थी वैभव रविंद्र मुसळे याने ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत झरी तालुक्यातील शेकापूर या गावामधे ५ टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत गावातील लोकांना व शेतकऱ्यांना समजावून सांगून निंबोळी अर्काचे फायदे देखील सांगितले.कडुनिंबाच्या बियांमध्ये निंबिडीन, आदीसह
अँझाडिरॅक्टीन, निंबिन, निंबोनीन, निंबिस्टेलॉल
अनेक महत्त्वाचे घटक आहे. यात निर्मिती खर्च अत्यल्प असून नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नसल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले.
माहिती कार्यक्रमा दरम्यान गावातील शेतकरी समीर गाहोकार, पुंण्डलिक वासेकार, राजेंद्र मुसळे, संकेत मुसळे, लखन वासेकार, सुधीर राजुरकार, पोलिस पाटिल रमेश मुसळे, तसेच इतर गाव करी बंधू उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. दत्ता जाधव, प्रा. शुभम शिरपुरकर, प्रा. पल्लवी येरगुडे, प्रा. स्नेहल आत्राम, प्रा. काजल माने, प्रा. गायत्री इंजालकर या शिक्षकांचे या विद्यार्थ्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.