सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (०३ सप्टें.) : पावसाळा सुरु आहे आणि मारेगाव सह ग्रामीण भागात टायफाईड मलेरिया डेंग्यू इत्यादी आजाराने थैमान घातले आहे. याकडे मारेगाव नगर पंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात विविध आजाराने डोके वर काढून ग्रामवाशी त्रस्त आहे. अशा आशयाचे निवेदन येथील मुख्यधिकारी यांना देण्यात आले.
मारेगाव नगर पंचायत द्वारे योग्य प्रकारे नाल्यांची साफ सफाई होत नसल्यानेच शहरात मच्छरांचे प्रमाण वाढल्याने रोगराई पसरली आहे.
त्यामुळे शहरात वाढलेल्या रोगराईमुळे नागरिक परेशान झाले असून, याकडे नगर पंचायत मुख्यधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन शहरात फवारणी करून नाल्याची साफसफाई करण्यात यावी. जर येत्या दोन दिवसात शहरातील नाली साफसफाई करून फवारणी केली नाही तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर मारेगाव च्या वतीने नगर पंचायत समोर आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल असा इशारा ही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, सचिन देवाळकर (भा.ज.पा.ता.महा सरचिटणीस), रवी टोंगे (भा.ज.यू.मो. महामंत्री), धनराज नागपुरे (भाजप उपाध्यक्ष), दुष्यन्त निकम (भा.ज.यू.मो), आकाश देठे, आकाश रुदई, प्रवीण वनकर आदींची उपस्थित होते.