अशोक मेश्राम मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेला सत्कार सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : 15 ऑगष्ट, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील भाऊसाहेब कोल्हे सभागृहात मा.अशोकराव मेश्राम मित्र परिवाराच्या वतीने माजी सैनिक, पंढरपूर दिंडीकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या जाहीर सत्कार आणि देशभक्ती गीत व फिल्मी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्रफुलभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, उद्घाटक मा.अंनत लक्ष्मणराव वाट माजी सैनिक, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.सुधिर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव, मा.अमित भोईटे तहसीलदार राळेगाव, मा.सुधिर पाटील जवादे, विनोद काकडे, संचालक बाजार समिती राळेगाव, अ.भा.सरपंच परिषद, मा.अशोक मारोती मेश्राम, मा.वरीष्ठ पोलिस अधीकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.

देशासाठी लढणाऱ्या माजी सैनिकांचा, पंढरपूर दिंडीकरी, व सामाजिक कार्यकर्ते यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अशोकराव मेश्राम मित्र परिवार यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या कार्यक्रमाला राळेगाव तालुक्यातील देशप्रेमी, बंधु भगीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होती.