सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : वंचित बहुजन आघाडी,यवतमाळच्या वतीने आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जाहीर सभा दिनांक ४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वाजता टिबंर भवन, धामणगांव रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन मारेगाव तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठा व ओवीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर वळणावर येवून पोहोचला असून समाजात जातीय तेढ निर्माण झाली आहे. ओबीसीच्या कोट्यातुन मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे ह्या भुमिकेमुळे ओबीसींना मंडल आयोगानुसार मिळालेले आरक्षण घोक्यात आले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), राष्ट्रवादी (अ.प.ग.), शिवसेना (शिंदे), शिवसेना (उ.बा.ठा.), भाजपा या प्रस्थापीत पक्षातील ओबीसी नेते (काही अपवाद सोडून) ओबीसीच्या आरक्षणाबद्दल स्पष्ट भुमिका घेण्यास तयार नसुन आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणापुढे ते लाचार आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण समर्थनार्थ भुमिका घेणे ही त्यांची मुख्य अडचण आहे. अशा अवस्थेमध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये एकमेकांविषयी वैरभावना निर्माण झाली आहे. करीता ओबीसी समाजातील अनेक सामाजिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेवून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आपण हाताळावा अशी विनंती केल्यामुळे ओबीसींचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक हित दृष्टीसमोर ठेवुन अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या आरक्षणाबद्दल जन जागृती व अनुसूचित जाती जमाती यांच्या हितरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रभर "आरक्षण बचाव यात्रा" 4 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे.
सभेचे मुख्य उद्दिष्ट पुढीलप्रमाणे :
• ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे.
• एस.सी, एस.टी.च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करा.
• ओबीसी विद्यार्थ्यांना एस.सी, एस.टी.च्या विद्यार्थ्याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी.
• ओबीसींना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.
• महाराष्ट्रातून १०० ओबीसी आमदार निवडून आणणे.
करीता सर्व आरक्षण समाज घटकांनी तसेच तालुक्यातील जनतेनी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे,असे आवाहन मारेगाव तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे यांनी केले आहे.