सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला दरवर्षी प्रमाणे स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी मजल दरमजल करीत निघालेली स्वच्छता दिंडी थेट पंढरपूरपर्यंत जाऊन तीन दिवस स्वच्छतेचे काम तालूक्यातील कानडा येथील गुरुदेव भजन मंडळ सह उपासकांनी केले.
पंढरपूरला दरवर्षी प्रमाणे स्वच्छता दिंडी मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन दि. १९,२०,२१ असे तीन दिवस कानडा व हिवरा येथील ११५ सेवकांनी सेवा दिली. यात कानडा येथील संरपचा सौ. सूषमा रूपेश ढोके सह सुरज येवले, हरिश्चंद्र डाहूले, भूषण ढोबळे, दिवाकर गाडगे, रामदास ढेंगळे, छाया गाडगे, नामदेव येडे, मुरली येवले, तुकाराम कडूकर, रूपेश ढोके सह महिला पुरुष सहभागी झाले होते.
आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांची मांदियाळी जमलेल्या पंढरपूरमध्ये ग्रामगीता तत्वज्ञान सक्रीय दर्शन मंदिर पंढरपूरचे संचालक सेवकराम दादा यांचे मार्गदर्शनातून स्वच्छता हे अभियान राबविण्यात आले.