शेतकरी पुत्राचा करंट लागून मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील वरुड येथील एका शेतकरी पुत्राचा करंट लागुन मृत्यु झाला. सदर घटना (ता.२१) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान उघडकीस आली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सतिश अशोक मंदे (३५) असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. मृतकाच्या आईच्या नावे चार एकर शेती असल्याचे समजते. 

रविवारी दुपारी दिड वाजताच्या सुमारास सतिश हा शेतात फवारणी करण्या साठी गेला होता, परंतु सायंकाळ होऊनही घराकडे परतले नसल्याने मृतकाची आई ही शेतात गेली, तेव्हा सतिश शेतातील बोर नजीक अर्थीगच्या तारा जवळ निपचित पडून दिसला. या दरम्यान, आईने त्याला स्पर्श करताच आईला सुध्दा विजेचा झटका लागुन ती सुध्दा पडल्याचे माहिती आहे. 
या घटनेची वार्ता गावात कळताच गावकरी धावून आले. लगेच सतिश ला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आणि मंदे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.