लाडकी बहिण योजनेच्या समितीवर राजु तुरणकर यांची निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सध्या राज्यात सुरु असलेल्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मृद व जल संधारण विभागाने तालुकास्तरावर देखरेख व नियंत्रण समिती स्थापन केली आहे. वणी तालुका देखरेख व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार हे असून अशासकीय सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजु तुरणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्या- साठी, कुटुंबातील त्यांची निर्यायक भूमिका मजबुत करण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली आहे. या योजनेच्या तालुकास्तरावरील देखरेच व संनियंत्रणासाठी समितीचे गठण करण्यात आले आहे. ही योजना महिला व बालविकास विभागाद्वारे राबविण्यात येत आहे.