सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : शेतकरी अभिनव बहुउद्देशीय सर्वसाधारण सेवा सहकारी संस्था मारेगाव च्या वतीने शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. आज 17 मार्च रोज रविवार ला दुपारी 1 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मार्डी येथील सभागृहात हे मार्गदर्शन शिबीर पार पडले.
शिबिराचे उदघाट्न माजी महिला व बाल कल्याण सभापती तथा शेतकरी अभिनव बहूउद्देशीय सहकारी संस्थेचे संचालक अरुणाताई खंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर पार पडलेल्या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेतकरी अभिनव बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संचालक अनिल देरकर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेगाव कृषी कार्यालयाचे मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, कांचणी फार्मर प्रोडूसर कपंनी वरोरा चे संचालक यशवंत सायरे,वैनगंगा व्हॅली शे उ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सैयद आबीद अली, कांचणी फार्मर प्रोडूसर कपंनी वरोरा सि ई ओ बालाजी धोबे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये बदलत्या हवामानामुळे शेती वरील संकट व त्यावरील उपाय योजना, शेती व्यवस्था, शेती उत्पन्नाची विपणन व्यवस्था, इत्यादी विषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात मोठया संख्येने परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी अभिनव बहुउद्देशीय सर्वसाधारण सेवा सहकारी संस्था मारेगावचे अध्यक्ष घनश्याम धोबे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मारोती गौरकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव सुरेंद्र काकडे, यांनी आणि त्यांच्या चमुंनी विशेष प्रयत्न केले.